शहरं
Join us  
Trending Stories
1
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?
3
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
4
विवाहांच्या मुहुर्तांदरम्यान सोन्या-चांदीच्या दरात बदल, पटापट चेक करा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे दर
5
BBA चं शिक्षण आणि व्यवसायाचं स्वप्न...; पैसे नव्हते म्हणून ६० लाखांची BMW घेऊन झाला फरार
6
छत्तीसगडच्या सुकमात भीषण चकमक; 10 नक्षलवाद्यांचा खात्मा, ओख-47 सह अनेक शस्त्रे जप्त
7
अंबरनाथच्या उच्चभ्रू सोसायटीतील घटना; कुमारी मातेने इमारतीतून फेकले अर्भक
8
WhatsApp चं अप्रतिम फीचर! आता व्हॉईस नोट्स टेक्स्टमध्ये बदलता येणार; जाणून घ्या, कसं?
9
नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघं ताब्यात; मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह चॅट
10
IPL 2025 कधीपासून सुरु होणार? BCCI ने पुढील ३ वर्षांच्या तारखा करून टाकल्या जाहीर
11
Wipro Bonus Shares : १४ व्यांदा बोनस शेअर देणार 'ही' दिग्गज कंपनी, ५ डिसेंबर पूर्वी रेकॉर्ड डेट
12
निकालांआधीच मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू; महायुती, मविआमधील या  नेत्यांची नावं चर्चेत
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मुख्यमंत्री मुंबईतच ठरणार', काँग्रेसच्या हायकमांडला संजय राऊतांचं आव्हान
14
Vikrant Massey : "ते टीव्ही स्टार्सला कमी लेखतात"; विक्रांत मेस्सीने इंडस्ट्रीतील मोठ्या स्टार्सची केली पोलखोल
15
१० मोठ्या मालमत्ताधारकांकडे ६०० कोटी रुपयांची थकबाकी; BMC ने दिला इशारा
16
IPL 2025: लिलावात 'या' भारतीय खेळाडूवर लागेल २५-३० कोटींची बोली; Mr. IPL ची भविष्यवाणी
17
धनुष-नयनतारा आमने सामने! ३ सेकंदाच्या व्हिडिओवरुन सुरु आहे वाद; एकाच रांगेत बसले अन्...
18
IND vs AUS : अवघ्या १५० धावांत टीम इंडिया All Out; पदार्पणात Nitish Reddy ची लक्षवेधी खेळी
19
या वीकेंडला OTT वर बघायला मिळेल सिनेमा अन् वेबसीरिजची मेजवानी! वाचा संपूर्ण यादी
20
जगातील सर्वात महाग कॉफी! महिन्याचा पगारही कमी पडेल, विकणारा आहे शेतकरी

नवी मुंबई मेट्रोचा प्रवास ३३ टक्क्यांनी झाला स्वस्त

By कमलाकर कांबळे | Published: September 05, 2024 7:58 PM

गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर तिकीट दरात कपात

कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : बेलापूर ते पेंधर दरम्यानचा मेट्रोचा प्रवास स्वस्त झाला आहे. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर सिडकोने तिकीट दरात ३३ टक्के कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सुधारित दरांनुसार आता तिकिटाचा किमान दर १० रुपये तर कमाल ३० रुपये इतका असणार आहे. ७ सप्टेंबरपासून तिकिटांचे नवीन दर लागू होणार आहेत. या निर्णयामुळे मेट्रोतून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल, असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी व्यक्त केला आहे.

बेलापूर ते पेंधर या ११.१० किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा गेल्या वर्षी १७ नोव्हेंबर रोजी प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. या मार्गावर एकूण ११ स्थानके आहेत. परंतु मेट्रोचे तिकीट दर जास्त असून, ते कमी करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. ही बाब लक्षात घेऊन विजय सिंघल यांनी गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर मेट्रोच्या तिकीट दरात ३३ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पहिल्या ० ते २ किमी आणि २ ते ४ किमी अंतरासाठी १० रुपये भाडे लागणार आहे तर, त्यापुढील ४ ते ६ किमी आणि ६ ते ८ किमी अंतरासाठी २० रुपये तिकीट दर लागणार आहेत. ८ ते १० किमीच्या टप्प्यासह त्यापुढील प्रवासासाठी ३० रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी, बेलापूर टर्मिनल ते पेंधर दरम्यानच्या अंतरासाठी तिकीट दर ४० रुपये इतका होता. नव्या दरानुसार याच अंतरासाठी प्रवाशांना आता ३० रुपये अदा करावे लागणार आहेत.

जलद आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय म्हणून नवी मुंबई मेट्रोला पसंती दिली जात आहे. या सेवेचा अधिकाधिक प्रवाशांना लाभ घेता यावा, यादृष्टीने तिकीट दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सुधारित तिकीट दरांमुळे जवळ आणि लांबच्या अंतरावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लाभ होईल.- विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

टॅग्स :ticketतिकिट