नवी मुंबई : गुन्हा मागे घेण्यासाठी अल्पवयीन मुलीसोबत दुष्कृत्य

By सूर्यकांत वाघमारे | Published: August 25, 2022 05:36 PM2022-08-25T17:36:17+5:302022-08-25T17:38:39+5:30

एका तरुणाने ओळखीचा गैरफायदा घेत तिच्यासोबत दुष्कृत्य करून व्हिडीओ बनवला होता.

Navi Mumbai misdemeanor with a minor girl to withdraw the crime | नवी मुंबई : गुन्हा मागे घेण्यासाठी अल्पवयीन मुलीसोबत दुष्कृत्य

नवी मुंबई : गुन्हा मागे घेण्यासाठी अल्पवयीन मुलीसोबत दुष्कृत्य

Next

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : अल्पवयीन मुलीसोबत दुष्कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपीने सदरचा गुन्हा मागे घेण्यासाठी वडिलांवर दबाव टाकण्याकिरता पुन्हा तिच्यासोबत दुष्कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तरुणाविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कामोठे परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थिनीसोबत हा प्रकार घडला आहे. एका तरुणाने ओळखीचा गैरफायदा घेत तिच्यासोबत दुष्कृत्य करून व्हिडीओ बनवला होता. याबाबत पीडित मुलीने वडिलांना कळवल्यानंतर २०२० मध्ये त्याला पॉक्सोच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. मोहम्मद समिम मुस्तकीम उर्फ राजू असे त्याचे नाव आहे. या गुन्ह्यात तो काही दिवसांपूर्वी जामिनावर सुटला असता त्याने पुन्हा पीडित मुलीला त्रास देण्यास सुरवात केली. यावेळी तो वडिलांना सांगून त्याच्यावर दाखल असलेला गुन्हा मागे घेण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होता. तसेच पूर्वीचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला तिच्याच मित्रासोबत गैरकृत्य करण्यास भाग पाडून त्याचाही बनवला होता.

मात्र इशारा देऊनही आपल्यावरील गुन्हा मागे न घेतल्याने अखेर बुधवारी त्याने पीडित अल्पवयीन मुलीचा तिच्या मित्रासोबतच्या दुष्कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला होता. पीडित मुलीला त्याबाबत मित्रांकडून समजताच याबाबत तिने घरी सांगितल्यानंतर पुन्हा त्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, त्याने इतरही मुलींसोबत अशी कृत्ये केली आहेत का? याची चौकशी केली जात आहे.

Web Title: Navi Mumbai misdemeanor with a minor girl to withdraw the crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.