रुग्णालय परिसरात नवी मुंबई महापालिकेची स्वच्छता मोहीम
By admin | Published: February 11, 2017 04:29 AM2017-02-11T04:29:00+5:302017-02-11T04:29:00+5:30
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहरात स्वच्छता पंधरवडा राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील हॉस्पिटल्स, क्लिनिक्स व नर्सिंग होम्स या ठिकाणी विशेष स्वच्छता
नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहरात स्वच्छता पंधरवडा राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील हॉस्पिटल्स, क्लिनिक्स व नर्सिंग होम्स या ठिकाणी विशेष स्वच्छता कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी रोजी वाशी विभागातील महापालिका रुग्णालयामध्ये स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रुग्णालय परिसराची स्वच्छता करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षाचे उपआयुक्त तुषार पवार, परिमंडळ-१चे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. वाशीतील रुग्णालयात आवश्यकतेनुसार कचराकुंड्या बसविण्यात आल्या. ओला व सुका कचरा वर्गीकरणाविषयी रुग्णालयातील कर्मचारी, डॉक्टर्स तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
वाशीतील रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, प्रशांत जवादे यांनी रुग्ण व नागरिकांना स्वच्छतेबाबत विशेष मार्गदर्शन केले. वाशी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी वाशी विभागातील स्वच्छता अधिकारी विनायक जुईकर, स्वच्छता निरीक्षक जयश्री आढाल, संतोष देवरस, यश पाटील, जयेश पाटील, डॉक्टर, नर्स व आरोग्य कर्मचारी, स्वच्छाग्रही व स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.