शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

नवी मुंबई महापालिका आयुक्तांची बदली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 12:10 AM

महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची शासनाने बदली केली आहे.

नवी मुंबई : महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची शासनाने बदली केली आहे. २ वर्षे ४ महिन्याच्या कार्यकाळात आयुक्तांनी महापालिकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम केले. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवून उत्पन्न वाढीवर लक्ष केंद्रित केले होते. आकृतिबंधास मंजुरी मिळवून देण्याबरोबरच स्वच्छ भारत अभियानावरही ठसा उमटवला.शासनाने मार्च २०१७ मध्ये तुकाराम मुंढे यांची बदली करून त्यांच्या जागेवर डॉ. रामास्वामी एन यांची नियुक्ती केली होती. मुंढे यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यामधील समन्वय कमी झाला होता. अशा परिस्थितीमध्ये रामास्वामी एन. महापालिकेचा कारभार कसा करणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. आयुक्तांनी पहिल्याच दिवशी मुंढे यांची चांगली कामे पुढे सुरूच ठेवणार व सर्र्वांना विश्वासात घेवून व कोणत्याही दबावाला बळी न पडता कामकाज करणार असल्याचे स्पष्ट केले. महापालिकेमधील अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवले व उत्पन्न वाढीवर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या कार्यकाळात महापालिकेने जवळपास २५०० कोटी रुपये मुदतठेवीमध्ये गुंतविले आहेत. २०१६ - १७ मध्ये १८३८ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता. २०१८ - १९ मध्ये तब्बल २०६४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.आयुक्तांच्या नियोजनबद्ध कामगिरीमुळे हे शक्य झाले होते. आयुक्तांच्या कार्यकाळात दोन वर्षे महापालिकेने सातत्याने स्वच्छ भारत अभियानामध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. देशातील पहिल्या दहा स्वच्छ शहरांमध्ये नवी मुंबई हे राज्यातील एकमेव महापालिकेचा समावेश झाला होता. घनकचरा व्यवस्थापन व नागरिकांचा प्रतिसाद या विभागामध्ये देशात प्रथम क्रमांक मिळविला.>कार्यकाळातील पैलूमहापालिकेने प्रथमच २०६४ कोटी रुपयांचा कर संकलित केलाजवळपास २५०० कोटी रुपये मुदत ठेवीमध्ये गुंतविलेदेशातील राहण्यायोग्य सर्वोत्तम शहरामध्ये नवी मुंबईची निवडमहापालिकेच्या शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम सुरू केलेमहापालिकेच्या आरोग्य व अग्निशमन दलामध्ये कर्मचारी भरतीप्रत्येक नोडमधील विकासकामांची घटनास्थळी जावून पाहणी

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका