क्षयरोग निर्मुलनासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे दानशूरांना आवाहन

By नामदेव मोरे | Published: August 5, 2022 08:51 PM2022-08-05T20:51:32+5:302022-08-05T20:51:41+5:30

भारत सरकारचे २०२५ पर्यंत देशाला क्षयरोग मुक्त करण्याचे उद्दिष्ट

Navi Mumbai Municipal Corporation appeals to donors for eradication of tuberculosis | क्षयरोग निर्मुलनासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे दानशूरांना आवाहन

क्षयरोग निर्मुलनासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे दानशूरांना आवाहन

Next

नामदेव मोरे, नवी मुंबई: महानगरपालिका कार्यक्षेत्रातील क्षयरुग्णांना मदत उपलब्ध करून देण्यासाठी उद्योगसमुह, स्वयंसेवी संस्था व दानशूरांनी पुढे यावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. भारत सरकारने सन 2025 पर्यंत देशाला क्षयरोग मुक्त करण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवले आहे. त्या अनुषंगाने शासन क्षयरुग्णांना वेगवेगळया पद्धतीने मदत देऊन त्यांना औषधोपचार मिळवून देत आहे. उपचारावर असणाऱ्या क्षयरुग्णांना शासनामार्फत प्रत्येक महिन्याला निक्षय पोषण योजनेअंतर्गत 500 रुपयाची मदत थेट बँक खात्यामध्ये दिली जात आहे. परंतू या व्यतिरिक्त्‍ क्षयरुग्णांना अतिरिक्त मदत देण्यासाठी केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियान हा उपक्रम राबविण्यात येत असून, या उपक्रमांतर्गत क्षयरुग्णांना अतिरिक्त पोषण आहार, डायग्नोस्टिक मदत, व्होकेशनल मदत या स्वरुपातील मदत उद्योगसमुह, सामाजिक संस्था व दानशूर यांनी करावी असे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

ही मदत उपचार सुरू असणाऱ्या क्षयरुग्णांना किमान 1 वर्षासाठी प्राधान्याने अतिरिक्त पोषण आहार तसेच डायग्नोस्टिक मदत, व्होकेशनल मदत व इतर आवश्यक मदत स्वरूपात उद्योग समूह, स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्ती इत्यादींच्या माध्यामातून उपलब्ध करून दयावयाची आहे. केंद्र शासनाच्या या महत्वाकांक्षी उपक्रमास सहकार्य करण्यास इच्छुक असलेले उद्योग समूह, स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्ती यांनी नमुंमपा आरोग्य विभाग मुख्यालय अथवा dtomhnvm@rntcp.org या ई-मेल आयडीव्दारे “निक्षय मित्र” म्हणून संपर्क साधावा आणि राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाला सहकार्य करुन एकजुटीने हातभार लावावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

Web Title: Navi Mumbai Municipal Corporation appeals to donors for eradication of tuberculosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.