नवी मुंबई महानगर पालिकेचा 5709 कोटी रूपयांचा अर्थसंकल्प सादर

By नामदेव मोरे | Updated: February 25, 2025 14:18 IST2025-02-25T14:17:00+5:302025-02-25T14:18:41+5:30

नवी मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंकल्प हा वचननामा म्हणून आम्ही सादर करत असल्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी स्पष्ट केले.

Navi Mumbai Municipal Corporation presents budget of Rs 5709 crore | नवी मुंबई महानगर पालिकेचा 5709 कोटी रूपयांचा अर्थसंकल्प सादर

नवी मुंबई महानगर पालिकेचा 5709 कोटी रूपयांचा अर्थसंकल्प सादर

नवी मुंबई: नवी मुंबई महानगर पालिकेचा  2025- 26 वर्षाचा 5709 कोटी रूपयांचा अर्थसंकल्प आयुक्त डाॅ. कैलास शिंदे यांनी सादर केला.   दर्जेदार पायाभूत सुविधेसह शिक्षण,  आरोग्य,  स्वच्छताअभियानासह क्रीडा सुविधा वाढविण्यावर  भर देण्यात आला आहे.

नवी मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंकल्प हा वचननामा म्हणून आम्ही सादर करत असल्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी स्पष्ट केले. वित्तीय सुधारणा   रोजगार निर्मितीसाठी विकास केंद्र,  गुणवत्ता पूर्ण शिक्षण,  सुलभ वाहतूक,  आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करणे. शाश्वत जलव्यवस्थापनावर भर देण्यात आला आहे. स्वच्छता अभियान,  पर्यावरण रक्षणावरही भर देण्यात आला आहे.

  पुढील वर्षभरात नागरी सुविधांवर 1079 कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत. पाणी पुरवठा व मलनिसःरण विभागावर 544 कोटी, उद्याने,  सार्वजनिक कामांसाठी इमारतींवर 505 कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत.  शिक्षण विकासावर 179 कोटी,  आरोग्य सुविधेवर 263 कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. 

महानगर पालिकेला अपेक्षीत उत्पन्न 

आरंभीची शिल्लक- 1301 कोटी
शासन अनुदान- 405 कोटी 
वस्तु व सेवा कर अनुदान- 1757 कोटी 
मालमत्ताकर- 1200 कोटी 
नगर रचना शुल्क- 343 कोटी 
संकिर्ण जमा- 248 कोटी 
पाणी पट्टी- मोरबे धरण - 150 कोटी 
व्याज- 112 कोटी 
मुद्रांक शुल्क अनुदान- 97 कोटी 
स्थानिक संस्था कर- 25 कोटी 
परवाना शुल्क, जाहिरात- 53 कोटी
मलनिसःरण- 16 कोटी
एकूण- 5709 कोटी 94 लाख

वर्षभरातील अपेक्षीत खर्च  ( आकडे कोटीत )

नागरी सुविधा- 1079
प्रशासकीय सुविधा- 773
पाणीपुरवठा- 544
उद्यान,  मालमत्ता- 505
ई गव्हर्नन्स- 661
सामाजिक विकास-70
घनकचरा व्यवस्थापन- 478
केंद्र,  राज्य योजना- 544
आरोग्य सेवा - 263
परिवहन- 270
आपत्ती निवारण- 47
शासकीय करपरतावा- 344
शिक्षण- 179
अतिक्रमण- 16
राखीव निधी- 500
एकूण- 5684 कोटी 94 लाख

Web Title: Navi Mumbai Municipal Corporation presents budget of Rs 5709 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.