नवी मुंबई: नवी मुंबई महानगर पालिकेचा 2025- 26 वर्षाचा 5709 कोटी रूपयांचा अर्थसंकल्प आयुक्त डाॅ. कैलास शिंदे यांनी सादर केला. दर्जेदार पायाभूत सुविधेसह शिक्षण, आरोग्य, स्वच्छताअभियानासह क्रीडा सुविधा वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.
नवी मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंकल्प हा वचननामा म्हणून आम्ही सादर करत असल्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी स्पष्ट केले. वित्तीय सुधारणा रोजगार निर्मितीसाठी विकास केंद्र, गुणवत्ता पूर्ण शिक्षण, सुलभ वाहतूक, आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करणे. शाश्वत जलव्यवस्थापनावर भर देण्यात आला आहे. स्वच्छता अभियान, पर्यावरण रक्षणावरही भर देण्यात आला आहे. पुढील वर्षभरात नागरी सुविधांवर 1079 कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत. पाणी पुरवठा व मलनिसःरण विभागावर 544 कोटी, उद्याने, सार्वजनिक कामांसाठी इमारतींवर 505 कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. शिक्षण विकासावर 179 कोटी, आरोग्य सुविधेवर 263 कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. महानगर पालिकेला अपेक्षीत उत्पन्न आरंभीची शिल्लक- 1301 कोटीशासन अनुदान- 405 कोटी वस्तु व सेवा कर अनुदान- 1757 कोटी मालमत्ताकर- 1200 कोटी नगर रचना शुल्क- 343 कोटी संकिर्ण जमा- 248 कोटी पाणी पट्टी- मोरबे धरण - 150 कोटी व्याज- 112 कोटी मुद्रांक शुल्क अनुदान- 97 कोटी स्थानिक संस्था कर- 25 कोटी परवाना शुल्क, जाहिरात- 53 कोटीमलनिसःरण- 16 कोटीएकूण- 5709 कोटी 94 लाखवर्षभरातील अपेक्षीत खर्च ( आकडे कोटीत )नागरी सुविधा- 1079प्रशासकीय सुविधा- 773पाणीपुरवठा- 544उद्यान, मालमत्ता- 505ई गव्हर्नन्स- 661सामाजिक विकास-70घनकचरा व्यवस्थापन- 478केंद्र, राज्य योजना- 544आरोग्य सेवा - 263परिवहन- 270आपत्ती निवारण- 47शासकीय करपरतावा- 344शिक्षण- 179अतिक्रमण- 16राखीव निधी- 500एकूण- 5684 कोटी 94 लाख