नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 11:42 PM2019-02-27T23:42:23+5:302019-02-27T23:42:26+5:30

महासभेत मंजुरी : इतर कर्मचाऱ्यांनाही वेतनवाढीची मागणी

Navi Mumbai Municipal employees to implement Seventh Pay Commission | नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

googlenewsNext

नवी मुंबई : नवी मुंबई पालिका सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या माध्यमातून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. बुधवारी २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या महासभेत याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या कर्मचाºयांप्रमाणे नवी मुंबई परिवहन सेवेतील अधिकारी आणि कर्मचाºयांना देखील सातवा वेतन आयोग लागू करण्याबरोबरच कंत्राटी, ठोक आणि रोजंदारी तत्त्वावर काम करणाºया कर्मचाºयांना वेतनवाढ करण्यात यावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली.


नवी मुंबई महापालिकेच्या सेवेत सुमारे २२00 कायमस्वरूपी कर्मचारी असून सुमारे साडेसहा हजार कंत्राटी आणि ठोक कामगार आहेत. २0१६ पासून लागू झालेल्या सातव्या वेतन आयोगानुसार सध्याच्या वेतनावर सुमारे ४0 टक्के वाढ मिळणार असून वेतनासोबतच फरकाची रक्कमही कर्मचाºयांना मिळणार आहे. यापुढे वेतनापोटी पालिकेला २३0 कोटींऐवजी ३२२ कोटी रु पये खर्च येणार आहे. या विषयावर नगरसेवक निवृत्ती जगताप, संजू वाडे, गणेश म्हात्रे, मनोहर मढवी, सूरज पाटील, डॉ.जयाजी नाथ, द्वारकानाथ भोईर आदींनी चर्चा केली.

या वेळी पालिका अधिकारी आणि कर्मचाºयांना न्याय देताना कंत्राटी, ठोक मानधन आणि परिवहन सेवेत काम करणाºया अधिकारी आणि कर्मचाºयांवर अन्याय होऊ नये अशी मागणी करीत या कर्मचाºयांना देखील सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली. सदस्यांच्या चर्चेनंतर महापौर जयवंत सुतार यांनी सदस्यांनी केलेल्या सूचनांची दखल प्रशासनाने घेण्याचे आदेश देत प्रस्ताव सूचनांसह मंजूर केला.

Web Title: Navi Mumbai Municipal employees to implement Seventh Pay Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.