नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये सी.पी.एस. पदवी, पदविका अभ्यासक्र म सुरू करण्यात आला आहे. यामुळे आरोग्य विभागासाठी ४६ डॉक्टर्स उपलब्ध होणार असून, चांगल्या सुविधा देता येणे शक्य होणार आहे.कॉलेज आॅफ फिजिशियन अॅण्ड सर्जन (सी.पी.एस.) अभ्यासक्रमाचे महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हा महत्त्वाचा निर्णय असून, शहरवासीयांना चांगल्या सुविधा देणे शक्य असल्याचे या वेळी सुतार यांनी सांगितले. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी आपल्या मनोगतात नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा आरोग्यसेवेकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता जाणून येथील डॉक्टरांची कमतरता दूर होण्याकरिता सी.पी.एस. अभ्यासक्र म सुरू करण्याचे ठरविले आणि यामध्ये शासनाचे संबंधित अधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केल्यामुळेच अत्यंत अल्प कालावधीत आज स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून याचे उद्घाटन संपन्न होत असल्याचा आनंद व्यक्त केला.सार्वजनिक रु ग्णालय, वाशी येथे बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, शस्त्रक्रि या विभाग, अस्थीरोग विभाग, कान, नाक, घसा विभाग, वैद्यकशास्त्र विभाग, त्वचारोग विभाग, नेत्ररोग विभाग, बधिरीकरण विभाग, प्रयोगशाळा व रक्तपेढी विभाग अशा एकूण ११ विभागांकरिता एकूण ३० डॉक्टर्स २४ तास उपलब्ध होणार आहेत. माँसाहेब मीनाताई ठाकरे सार्वजनिक रु ग्णालय, नेरु ळ व माता बाल रु ग्णालय, बेलापूर येथे बालरोग व स्त्रीरोग या दोन विभागांकरिता एकूण आठ डॉक्टर्स आणि राजमाता जिजाऊ सार्वजनिक रु ग्णालय, ऐरोली येथे सहा डॉक्टर्स २४ तास उपलब्ध होणार आहेत. सी.पी.एस. कोर्सचा अभ्यासक्र म पदविकांसाठी दोन वर्षांचा व पदवीसाठी तीन वर्षांचा कालावधी असल्याने नवी मुंबई महानगरपालिकेकडे पहिल्या वर्षी ४६ डॉक्टर्स, तर तीन वर्षांनंतर प्रत्येक वर्षी १०० पेक्षा जास्त डॉक्टर्स उपलब्ध असणार आहेत.याप्रसंगी आमदार मंदा म्हात्रे, संदीप नाईक, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, अनिता मानवतकर, उषा भोईर, नेत्रा शिर्के, अविनाश लाड, डॉ. जयाजी नाथ, राजू शिंदे व प्रदीप गवस, अतिरिक्त आयुक्त रमेश चव्हाण, रवींद्र पाटील, शहर अभियंता मोहन डगांवकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद कटके, डॉ. धनवंती घाडगे, डॉ. प्रशांत जवादे, डॉ. वर्षा राठोड उपस्थित होते.
नवी मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग सक्षम होणार, ४६ डॉक्टर्स उपलब्ध होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 2:29 AM