शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

महापालिका करणार मातृभाषेचा जागर; नागरिकांनो, तुम्हीही सहभागी व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 1:14 PM

या कार्यक्रमाचा शुभारंभ १५ जानेवारी रोजी सुप्रसिद्ध साहित्यिक, व्याख्याते प्रा. प्रवीण दवणे यांच्या ‘मायबोली मराठी’ या विषयावर उपस्थितांशी हृदयसंवादाने होणार असून, सकाळी ११ वाजता महापालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे हा कार्यक्रम होणार आहे.

नवी मुंबई :  राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या निर्देशानुसार १४ ते २८ जानेवारी या कालावधीत संपूर्ण राज्यभरात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे. त्यास अनुसरून  साहित्यप्रेमी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात मान्यवरांच्या व्याख्यानासोबत अधिकारी, कर्मचाऱ्यांमधील मराठी साहित्यप्रेमाला वाव देऊन नानाविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत.या कार्यक्रमांतून मातृभाषेचा प्रचार-प्रसार होऊन कार्यालयीन कामकाजात मराठी भाषेचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर व्हावा, अशाप्रकारे कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ १५ जानेवारी रोजी सुप्रसिद्ध साहित्यिक, व्याख्याते प्रा. प्रवीण दवणे यांच्या ‘मायबोली मराठी’ या विषयावर उपस्थितांशी हृदयसंवादाने होणार असून, सकाळी ११ वाजता महापालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे हा कार्यक्रम होणार आहे.

मान्यवरांची व्याख्याने    १६ जानेवारीला सकाळी ११ वाजता महाराष्ट्र शासनाचे निवृत्त माहिती संचालक प्रल्हाद जाधव यांचे कार्यालयीन कामकाजात मराठीचा वापर या अनुषंगाने वाणी, भाषा, लेखणी आदी विषयांवर व्याख्यान देणार आहेत.     १९ जानेवारीला लेखक, निवेदक डॉ. मृण्मयी भजक या ‘अमेरिका खट्टी मिठी’ या नाट्य अभिवाचनात्मक कार्यक्रमातून मराठी चष्म्यातून आंबटगोड अमेरिकेची सफर घडविणार आहेत. महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित विविध उपक्रमांत प्रत्यक्ष सहभाग असावा, यादृष्टीने त्यांच्याकरिता ३ स्पर्धा आयोजित केल्या आहेत.     यातील पहिली स्पर्धा उपक्रम २३ जानेवारीला सकाळी ११ पासून राबविला जात असून, ‘माझे संविधान माझा अभिमान’ या विषयावर ‘वक्तृत्व स्पर्धा’ होणार आहे. ५ मिनिटांत विचार मांडायचे आहेत. दुसरी स्पर्धा मराठी कवितेचा समृद्ध वारसा यात पालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आवडलेल्या कवितेचे सादरीकरण करायचे आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका