नवी मुंबई : विनापरवाना भिंतीपत्रके चिटकवून जाहिरातबाजी केल्याप्रकरणी महापालिकेतर्फे सतरा कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये नोकर भरतीच्या जाहिरातदारांसह इतरही विविध प्रकारच्या कंपन्यांचा समावेश आहे.
पालिकेच्या मालकीच्या वास्तू तसेच सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना जाहिरातबाजी, भिंतीपत्रके चिकटवण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. तशा प्रकारच्या सूचना देखील पालिकेकडून करण्यात आल्या आहेत. यानंतरही अनेक कंपन्यांकडून त्यांच्या जाहिरातीसाठी सार्वजनिक ठिकाणी स्टिकर चिटकवले जातात. अशा जाहिरातबाजीमुळे परिसर विद्रुप होत असतो. मात्र त्यानंतरही अनेक कंपन्या अथवा जाहिरातदार एजन्सीकडून विनापरवाना भिंतीपत्रके चिटकवली जातात. पालिकेच्या अतिक्रमण विभागाने अशा जाहीरातदार कंपन्यांविरोधात कारवाईचे पाऊल उचलले आहे. त्याकरिता परिसरात विनापरवाना जाहिरातींचा शोध घेऊन संबंधीत कंपन्यांविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यामध्ये यात्रा कंपन्या, खासगी क्लासेस, पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र, सलुन तसेच नोकरी संबंधीच्या एजंसी अशा सतरा कंपन्यांचा समावेश आहे. त्यांच्याविरोधात मालमत्ता विद्रुपणास प्रतिबंध अधिनियम अंतर्गत सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.विद्युत खांबावरही भित्तीपत्रक चिटकविलेच्शहरातील अनेक नोडमध्ये विनापरवाना लावलेल्या जाहिराती मोठ्या संख्येने पाहायला मिळत आहेत. एनएमएमटीचे बस थांबे राजकीय व्यक्तींना जाहिरातीसाठी आंदण देण्यात आल्याचे दिसून येत आहे.च्विद्युत खांबांवर देखील छोट्या मोठ्या भिंतीपत्रकाद्वारे विनापरवाना जाहीरातबाजी होताना दिसते. त्यामुळे संपूर्ण शहरात कारवाईची मोहीम राबवून विद्रूपीकरणाला आळा घालण्याची मागणी होत आहे.