- नामदेव मोरेनवी मुंबई - नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पनवेल व नवी मुंबईकरांचा श्वास गुदमरू लागला आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक २०६ वर पोहचला आहे.हवेतील धुळीकणांचे प्रमाण वाढत असून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे.
सुनियोजीत शहर असा उल्लेख असलेल्या नवी मुंबई, पनवेलमध्ये पर्यावरणाचे संतूलन ढासळू लागले आहे. ठाणे बेलापूर व तळोजा औद्याकीक वसाहत, नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळाचे बांधकाम, दगडखाणींसह प्रदूषण पसरविणारे उद्योग या सर्वांमुळे हवेतील धुळीकणांचे प्रमाण वाढत आहे. सायन - पनवेल महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवरील धुळीमुळेही हवा प्रदूषण वाढत आहे. पावसाळ्याचा कालावधी वगळला तर दोन्ही महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील हवा गुणवत्ता निर्देशांक असमाधानकारक स्थितीमध्ये असतो. नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच प्रदूषण वाढले आहे. हवेमध्ये दिवसभर धुके असल्यासारखा भास होऊ लागला आहे. पहाटे चालणे व धावण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांनाही धुळीकणांमुळे श्वास घेण्यास त्रास होत आहे.
वाढलेल्या प्रदुषणामुळे ज्येष्ठ नागरिक, दम्याचा त्रास असलेले रुग्ण व इतर नागरिकांनाही त्रास होत आहे. बहंतांश सर्व विभागात हवा गुणवत्ता निर्देशांक वाढला आहे. एमआयडीसी परिसरामध्ये रात्री व पहाटे रसायनांच्या वासाचा त्रास सहन करावा लागत आहे. नाल्यांमध्ये रसायनमिश्रीत पाणी सोडल्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
रस्ते धुण्याची प्रक्रीया थांबलीप्रदुशन कमी करण्यासाठी रस्ते पाण्याने धुण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. नवी मुंबई महानगरपालिकेनेही दोन अत्याधुनीक वाहनांच्या सहाय्याने रस्ते धुण्यास सुरुवात केली होती. पण ५५० किलोमीटर लांबीचे रस्ते धुणे रोज शक्य नसल्यामुळे सद्यस्थितीमध्ये रस्ते धुण्याची प्रक्रिया जवळपास थांबली आहे.
विभागनिहाय हवा प्रदुषण निर्देशांकविभाग - निर्देशांकमहापे - १६७सानपाडा २२४नेरूळ १५२कळंबोली २५२तळोजा २०७