शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

नवी मुंबई : वर्षभरात ४५६१ गुन्हे, संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 2:22 AM

पोलिसांसाठी २०१७ हे वर्ष कसोटी पाहणारे ठरले. वर्षभरामध्ये ४५६१ गुन्हे दाखल झाले असून ६७ टक्के गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण ७ टक्क्याने घसरले असून न्यायालयात गुन्हे सिद्ध करण्याचे प्रमाणही ६० वरून ४५ टक्के झाले असून ते वाढविण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

नवी मुंबई : पोलिसांसाठी २०१७ हे वर्ष कसोटी पाहणारे ठरले. वर्षभरामध्ये ४५६१ गुन्हे दाखल झाले असून ६७ टक्के गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण ७ टक्क्याने घसरले असून न्यायालयात गुन्हे सिद्ध करण्याचे प्रमाणही ६० वरून ४५ टक्के झाले असून ते वाढविण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये सलग तीन वर्षे गुन्ह्यांची संख्या कमी करण्यात पोलीस यंत्रणेला यश आले आहे. २०१५ मध्ये ५४०५ गुन्हे दाखल झाले होते. २०१६ मध्ये ४८०१ व २०१७ मध्ये ही संख्या ४५६१ एवढी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये २४० गुन्हे कमी दाखल झाले आहेत. गुन्हे दाखल होण्याची संख्या कमी झाली ही दिलासादायक गोष्ट असली तरी गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण कमी होत असून ती पोलिसांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. २०१६ मध्ये विक्रमी ७४ टक्के गुन्ह्यांचा उलगडा झाला होता. न्यायालयात गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाणही ६० टक्के असे राज्यात सर्वात जास्त होते. परंतु २०१७ मध्ये प्रकटीकरणाची टक्केवारी ६७ झाली आहे. सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे.२०१६ च्या तुलनेमध्ये सोनसाखळीचे २६, घरफोडीचे ३९, चोरीचे ४६ व प्राणांतिक अपघाताचे ५७ गुन्हे कमी करण्यात यश आले आहे. आयुक्तालय क्षेत्रामध्ये दरोड्याचे ८ गुन्हे दाखल झाले होते. यामध्ये बँक आॅफ बरोडा व वाशीतील व्यापाºयाच्या घरावर झालेल्या दरोड्याचाही समावेश आहे. सर्व ८ गुन्हे उघडकीस आले असून ६५ टक्के माल हस्तगत करण्यात आला आहे.अमली पदार्थ विरोधी पथकाने वर्षभरामध्ये चांगली कामगिरी केली आहे. १९ गुन्हे दाखल करण्यात आले असून २८ आरोपींना अटक केली आहे. तब्बल ५४ किलो ७४६ ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. ४६५ ग्रॅम मेथाफेटामाईन हे केमिकल आंतरराज्य टोळीकडून जप्त केले आहे. पोलिसांनी वर्षभर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. ८ गुन्ह्यांमध्ये मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. एकूण ४६ आरोपींवर मोक्का लावला आहे. शस्त्र बाळगल्याप्रकरणी २९ आरोपींना अटक केली आहे.सायबर गुन्ह्यांवर विशेष लक्षवर्षभरामध्ये सायबर सेल मध्ये ९५८ जणांनी तक्रारी केल्या होत्या. ७२ गुन्हे दाखल झाले असून २६ गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. एकूण १०५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.सायबर गुन्ह्यांमध्ये रिलायन्स कंपनी व जेएनपीटीमधील जीटीआय पोर्टमधील संगणक हॅक केल्याचा गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलिसांचे संकेतस्थळही हॅक करण्यात आले होते.दोषी पोलिसांवर कारवाईकामात कुचराई करणाºयांवरही कडक कारवाई करण्यात येत आहे. वर्षभरामध्ये ७ कर्मचारी सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. ५ अधिकारी, कर्मचाºयांनाही बडतर्फ केले असून एका व्यक्तीला सक्तीने निवृत्ती घेण्यास भाग पाडण्यात आले आहे. याशिवाय ७ जणांना बडतर्फीसाठी, १५ जणांना सेवेतून काढून टाकण्याची व दोघांना सक्तीने निवृत्तीची कारवाई का करू नये अशी नोटीस दिली आहे. याशिवाय एकूण ६० जणांची खातेअंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे.पोलिसांनी आॅपरेशन मुस्कानअंतर्गत चांगली कामगिरी केली आहे. १७ बालकांचा शोध घेतला आहे. ३ मुली व १७ महिलांची सुटका करून घेतली असून ३० आरोपींना अटक केली आहे.वाहतूक पोलिसांनी वर्षभरामध्ये ४,०५,८१६ केसेस करण्यात आल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेमध्ये २०,२९२ जास्त केसेस केल्या आहेत. मद्यप्राशन करणाºया ५८८ जणांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांमुळे अपघात कमी करण्यात यश आले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrimeगुन्हा