Navi Mumbai: ऑनलाईन कमाईचे प्रलोभन पडले महागात, १० लाख रुपयांची फसवणूक
By नामदेव मोरे | Published: April 30, 2023 12:42 PM2023-04-30T12:42:48+5:302023-04-30T12:43:08+5:30
Crime News: पनवेलमध्ये राहणाऱ्या एक व्यक्तीला युट्यूबवरील लिंक लाईक केल्यास त्याबदल्यात पैसे देण्याचे अमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. संबंधीतांची तब्बल १० लाख ५२ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.
- नामदेव मोरे
नवी मुंबई - पनवेलमध्ये राहणाऱ्या एक व्यक्तीला युट्यूबवरील लिंक लाईक केल्यास त्याबदल्यात पैसे देण्याचे अमिष दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. संबंधीतांची तब्बल १० लाख ५२ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.
नवीन पनवेल परिसरात राहणाऱ्या एस. एस. उपाध्याय यांना १० एप्रिलला मोबाईलवर संदेश आला. तुम्हास पाठविलेल्या यू ट्यूब लिंक ला लाईक केल्यास प्रत्येक लाईकला ५० रुपये देण्याचे सांगितले. संबंधीतांनी त्याप्रमाणे कृती केल्यानंतर त्यांना पैसे पाठवून देण्यात आले. याविषयी पुढील टास्क पूर्ण करण्यासाठी टेलीग्राम ॲप्लीकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले व टास्क पूर्ण केल्यानंतर त्याचा मोबदलाही दिला. जवळपास ११ लिंक पाठवून लाईक केल्यानंतर मोबदला देऊन विश्वास संपादन केला. गोड बोलून बँक खात्याचा तपशील मिळविला व पुढील टास्कसाठी १० लाख ५२ हजार रुपये भरण्यास सांगितले. संबंधीतांनी विश्वास ठेवून पैसे भरले. परंतु त्यांना भरलेले पैसे व त्या बदल्यातील मोबदला दिलेला नाही. फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच या प्रकरणी खांदेश्वर पोलिस स्टेशनमध्ये शनिवारी सायंकाळी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.