नवी मुंबई शहरात मुलींनीच मारली बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 11:49 PM2020-07-29T23:49:11+5:302020-07-29T23:49:14+5:30
अनेक शाळांनी राखली यशाची परंपरा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च, २0२0 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. नवी मुंबई शहराचा निकाल ९७.९५ टक्के लागला आहे. या वर्षीही मुलीच अव्वल ठरल्या आहेत. शहरातील अनेक शाळांचा निकाल १00 टक्के लागला असून, या शाळांनी यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना परीक्षेच्या निकालाची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. या वर्षी नवी मुंबई शहरातील १४१ शाळांमधून सुमारे १४,८२३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यामधील १४,८0५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी १४,५0२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या वर्षी कोरोनाचा संसर्ग असल्याने परीक्षेचा निकाल उशिरा लागला. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. विशेष म्हणजे, नवी मुंबई महापालिकेच्या शाळाही मागे राहिलेल्या नाहीत. महापालिकेच्या एकूण १८ माध्यमिक शाळांपैकी वाशी, दिघा, दिवाळे , सानपाडा आणि पावणेगाव येथील पाच शाळांचा निकाल १00 टक्के लागला आहे.
शाळा बंद असल्याने घरीच आनंद साजरा
नवी मुंबई शहरात कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी वाढत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शाळाही अद्याप सुरू झालेल्या नाहीत. निकालाच्या दिवशीही शाळा बंदच होत्या. आॅनलाइन निकाल जाहीर झाल्यावर शिक्षकांची आणि मित्र-मैत्रिणींची प्रत्यक्षात भेट घेता आली नसली, तरी शिक्षकांनी आणि मित्र-मैत्रिणींनी फोन करून शुभेच्छा दिल्या. परीक्षेत यश मिळाल्याचा आनंद विद्यार्थ्यांनी पालकांसोबत घरीच साजरा केला.
७७ शाळांचा निकाल १00 टक्के
च्नवी मुंबई शहरातील १४१ शाळांच्या माध्यमातून १४,८0५ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते.
च्यामधील १४,५0२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, शहरातील खासगी आणि महापालिका अशा एकूण सुमारे ७७ शाळांचा निकाल १00 टक्के लागला आहे.
समाजमाध्यमांवर शुभेच्छांचा वर्षाव
च्दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर विविध व्हॉट्सअॅप ग्रुप आणि फेसबुकच्या माध्यमातून परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
च्अनेकांनी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या निकटवर्तीयांचे फोटो व्हॉट्सअॅपच्या स्टेट्सला ठेवले होते.