नवी मुंबई : पोलीस महासंचालकांच्या वतीने आयोजित वादविवाद स्पर्धेत कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक गौतम भोईर यांनी मराठी माध्यमातून प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर इंग्रजी माध्यमातून पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार यांना प्रथम क्रमांक पटकावला आहे. पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्या वतीने राज्यस्तरीय मानवी हक्क जागृती वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत राज्यातून सुमारे ३५ अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. त्यांच्यात ३० मार्च रोजी मराठी व इंग्रजी अशा दोन माध्यमांतून ही स्पर्धा घेण्यात आली होती. यावेळी झालेल्या वादविवादामध्ये कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक गौतम भोईर यांनी उत्तमरीत्या चर्चा करून स्पर्धेचा मराठी माध्यमातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. याबद्दल त्यांना प्रशस्तिपत्र तसेच १० हजार रुपयांचे पारितोषिक देवून गौरवण्यात आले.
वादविवाद स्पर्धेत नवी मुंबई पोलिसांची बाजी
By admin | Published: April 25, 2017 1:23 AM