Navi Mumbai: डंपरच्या धडकेत पोलिस शिपायाचा मृत्यू,पत्नी जखमी, दुचाकीवरून जात असताना घडला अपघात 

By सूर्यकांत वाघमारे | Published: June 28, 2024 06:53 PM2024-06-28T18:53:49+5:302024-06-28T18:54:19+5:30

Navi Mumbai Accident News: डंपरच्या धडकेत पोलिस शिपाई मृत पावल्याची घटना खांदेश्वर येथे घडली आहे. ते पत्नीसह मोटारसायकलवरून जात असताना त्यांच्यासोबत हा अपघात घडला. याप्रकरणी डंपर चालकावर खांदेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Navi Mumbai: Police constable killed in collision with dumper, wife injured, accident happened while riding a bike  | Navi Mumbai: डंपरच्या धडकेत पोलिस शिपायाचा मृत्यू,पत्नी जखमी, दुचाकीवरून जात असताना घडला अपघात 

Navi Mumbai: डंपरच्या धडकेत पोलिस शिपायाचा मृत्यू,पत्नी जखमी, दुचाकीवरून जात असताना घडला अपघात 

- सूर्यकांत वाघमारे 
नवी मुंबई - डंपरच्या धडकेत पोलिस शिपाई मृत पावल्याची घटना खांदेश्वर येथे घडली आहे. ते पत्नीसह मोटारसायकलवरून जात असताना त्यांच्यासोबत हा अपघात घडला. याप्रकरणी डंपर चालकावर खांदेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अरुण शामराव कर्ले असे अपघातामध्ये मृत पावलेल्या पोलिस शिपाईचे नाव आहे. ते कळंबोली वाहतूक शाखेत कार्यरत होते. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर ते नवी मुंबई पोलिस दलात भरती झाले होते. शुक्रवारी त्यांना साप्ताहिक सुट्टी असल्याने सकाळी पत्नीसह मोटारसायकलवरून टेंभोडे गावाकडे चालले होते. त्यांची मोटरसायकल टेंभोडे येथील पुलाखाली आली असता दुसऱ्या मार्गावरून आलेल्या भरधाव डंपरने त्यांना धडक दिली. यामध्ये दोघे पती पत्नी गंभीर जखमी झाले असता त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार दरम्यान डॉक्टरांनी अरुण कर्ले यांना मृत घोषित केले. तर त्यांच्या पत्नीची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अपघातानंतर डंपर चालकाला खांदेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Navi Mumbai: Police constable killed in collision with dumper, wife injured, accident happened while riding a bike 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.