नवी मुंबई: नवी मुंबई परिसरात सोसाट्याच्या वा-यासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे फटाका विक्रेत्यांची व इतर व्यवसायीकांचीही धावपळ उडाली.
रात्री 9 पासून विविध ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटला होता. साडेनऊ ला ऐरोली परिसरात पावसाने हजेरी लावली. विजाही चमकू लागल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. जोरात पाऊस येत असल्याने फटाके व दिवाळी साहित्य विक्रेत्यांनी दुकानाबाहेर ठेवलेले साहित्य हलविण्यासाठी लगबग करावी लागली.