जगण्यायोग्य शहरांच्या यादीत नवी मुंबई देशात सहाव्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 12:25 AM2021-03-05T00:25:18+5:302021-03-05T00:25:30+5:30

पालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

Navi Mumbai ranks sixth in the country in the list of livable cities | जगण्यायोग्य शहरांच्या यादीत नवी मुंबई देशात सहाव्या क्रमांकावर

जगण्यायोग्य शहरांच्या यादीत नवी मुंबई देशात सहाव्या क्रमांकावर

Next

देशातील जगण्यायोग्य शहरांच्या यादीमध्ये नवी मुंबईला सहावा क्रमांक मिळाला असून राज्यात दुसरा क्रमांक मिळाला आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने १११ शहरांचे सर्वेक्षण करून ही यादी प्रसिद्ध केली आहे. या सर्वेक्षणामुळे नवी मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. केंद्र शासनाने २०१८ पासून देशातील जगण्यायोग्य शहरांचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे. देशातील १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असणारे व त्यापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या शहरांचे सर्वेक्षण करण्यात येते. नागरिकांना शहरात उपलब्ध होणाऱ्या सुविधा, राहण्यासाठी आवश्यक असलेले वातावरण, विकासकामे या सर्वांचा आढावा या सर्वेक्षणामध्ये घेण्यात येतो. 

गुरुवारी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या यादीमध्ये पहिल्या दहा शहरांमध्ये नवी मुंबईचा सहावा क्रमांक आला आहे. तर, राज्यात पुण्यानंतर दुसरा क्रमांक मिळवला आहे. या यादीमध्ये मुंबई दहाव्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे एमएमआरडीए परिसरातील महानगरपालिकांमध्ये नवी मुंबई पहिल्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. नवी मुंबई हे सुनियोजित शहर असून मागील २९ वर्षांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने नियोजनबद्धपणे विकासकामे केली आहेत. यामुळे आतापर्यंत महानगरपालिकेला राष्ट्रीय व राज्य स्तरावरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यापूर्वी संत गाडगे महाराज स्वच्छता अभियानामध्ये दोन वेळा राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे. 

केंद्र शासनाच्या स्वच्छता अभियानामध्येही सातत्याने ठसा उमटविला आहे. घनकचरा व्यवस्थापनामध्ये देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. जल व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन यासाठीही महानगरपालिकेने पुरस्कार मिळविले आहेत.  महानगरपालिकेने मोरबे धरण विकत घेतले असल्यामुळे शहरवासीयांना चोवीस तास पाणीपुरवठा करणे शक्य होत आहे. प्राथमिक ते उच्च शिक्षणाची सर्वोत्तम सुविधा शहरात उपलब्ध हाेत आहे. महानगरपालिका व खासगी रुग्णालयांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांना आरोग्य सुविधाही चांगली असल्यामुळेच नवी मुंबईचा जगण्यायोग्य शहरांमध्ये समावेश झाला आहे. 

शहरात दोनशेपेक्षा जास्त उद्यानांचा समावेश 
nसर्व प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण व अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण.
nदेशातील सर्वात भव्य रेल्वे स्टेशनचा समावेश. 
nबस, रेल्वे व सार्वजनिक वाहतुकीची सर्वोत्तम सुविधा.
nदेशातील  सर्वात स्वच्छ शहरांमध्ये नवी मुंबईचाही समावेश.
n शहरात रस्ते, पाण्यासह उत्तम नागरी सुविधा उपलब्ध 

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना सर्वोत्तम सुविधा देण्यास प्राधान्य देण्यात येते. या सुविधांमुळे देशातील राहण्यायोग्य शहरांच्या यादीत देशात सहावा व राज्यात दुसरा क्रमांक मिळाल्याने शहराचा बहुमान वाढला आहे. नवी मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. भविष्यात स्वच्छता अभियानामध्येही सर्वोत्तम कामगिरी करण्यास प्राधान्य देण्यात येईल. 
    - अभिजित बांगर, आयुक्त महानगरपालिका

Web Title: Navi Mumbai ranks sixth in the country in the list of livable cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.