शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

नवी मुंबईकरांचे अडकले साडेसात कोटी रुपये; २०६ नागरिकांनी केली आहे गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2019 2:29 AM

तक्रारदारांची संख्या वाढण्याची शक्यता

नवी मुंबई : गुडविन ज्वेलर्स दुकानामध्ये नवी मुंबईमधील २०६ पेक्षा जास्त नागरिकांनी विविध योजनांमध्ये पैसे गुंतविल्याचे समोर आले आहे. गुंतवणूकदारांचे आतापर्यंत सात कोटी ४८ लाख १२ हजार रुपये अडकल्याचे स्पष्ट झाले असून, हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोपरखैरणेमध्ये राहणाऱ्या नीता चोरघे यांनी गुडविन ज्वेलर्समध्ये दहा लाख ८५ हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. व्यवस्थापनाने पैसे परत दिले नसल्यामुळे त्यांनी एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून सुनील कुमार, सुधेश कुमार व व्यवस्थापक नितीन यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पाम बीच रोडवरील सतरा प्लाझा इमारतीमध्ये आॅक्टोबर २०१७ मध्ये गुडविन ज्वेलर्सची शाखा सुरू करण्यात आली. व्यवस्थापनाने विविध योजना जाहीर करून गुंतवणूकदारांना आकर्षित केले होते. फिक्स डिपॉझिट व मासिक डिपॉझिट स्वरूपात पैसे घेतले होते. दोन वर्षांमध्ये २०६ पेक्षा जास्त नागरिकांनी पैशांची गुंतवणूक केली होती. जवळपास सात कोटी ४८ लाख १२ हजार ८४० रुपये गुंतविल्याचे तपासात समोर आले आहे. कोपरखैरणेमधील महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

गुडविन ज्वेलर्सच्या शाखेला पोलिसांनी सील केले आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या नागरिकांनी संख्या अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या गुन्ह्याच अधिक तपास सुरू असून तो पोलीस निरीक्षक बी. एस. सय्यद करत आहेत.दोन गुंतवणूकदार इस्पितळात दाखलगुडविन ज्वेलर्सकडून लाखो रुपयांची फसवणूक झाल्याने मानसिक धक्का बसलेल्या एक-दोन गुंतवणूकदारांना येथील खासगी इस्पितळात दाखल केले आहे तर दिवाळीत दररोज पोलीस स्टेशनचे हेलपाटे मारणाºया एका गुंतवणूकदाराच्या दुचाकीला झालेल्या अपघातात त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. गुडविनच्या गुंतवणूकदारांपैकी एकाने ही माहिती दिली. मात्र त्यांची नावे उघड करण्यास नकार दिला.

गुडविन ज्वेलर्सचा मालक परागंदा झाल्याची माहिती मिळताच गुंतवणूकदारांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गेल्या शनिवारपासून गुरुवारपर्यंत पोलीस ठाण्याच्या हेलपाटे मारण्यातच यंदाची दिवाळी संपल्याची खंत गुंतवणूकदारांनी व्यक्त केली.बँका तसेच पतपेढीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर मिळणाºया व्याजापेक्षा अधिक व्याजदर देण्याचे प्रलोभन गुडविन ज्वेलर्सतर्फे ग्राहकांना दाखविले होते. त्याला बळी पडलेल्या शेकडो ग्राहकांनी आपली जमापुंजी गुडविनच्या विविध योजनांमध्ये गुंतवली. काहींनी गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतर दुकानात जावून सुनीलकुमार आणि सुधीशकुमार यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा, सध्या आर्थिक अडचण असल्याचे कारण सांगत लवकरच तुम्हाला परतावा मिळेल, असे सांगण्यात आले होते. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून गुंतवणूकदारांनी काही महिने वाट पाहिली. अचानक दुकान दोन दिवसांसाठी बंद असल्याचा फलक दुकानाबाहेर लावून दुकान बंदच केले. गुंतवणूकदारांनी दिलेल्या तक्रारीवरुन रामनगर पोलिसांनी शनिवारी दुकान सील केले. शनिवारपासून गुंतवणूकदार पोलीस ठाण्याच्या पायºया झिजवत आहेत.

गुंतवणूक केलेले पैसे तरी परत मिळावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. पोलिसांकडून कोणत्याच प्रकारची माहिती मिळत नसल्याची खंत गुंतवणूकदारांनी व्यक्त केली. या घटनेचा धसका घेतल्यानंतर यापुढे कोणत्याच प्रलोभनाला बळी पडणार नाही. इतकेच नव्हे तर इतर कोठेही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करणार नसल्याचे गुंतवणूकदारांनी सांगितले.

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिस