Navi Mumbai: समाजवादी पक्षाला नवी मुंबईत खिंडार, जिल्हाध्यक्षांसह पदाधिकारी शिवसेनेत
By नामदेव मोरे | Published: February 11, 2024 03:07 PM2024-02-11T15:07:24+5:302024-02-11T15:09:41+5:30
Navi Mumbai: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेशाचा धडाका सुरू केला आहे. नवी मुंबईमधील समाजवादी पक्षालाही खिंडार पडले असून पक्षाच्या जिल्हा अध्यक्षासह पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
- नामदेव मोरे
नवी मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेशाचा धडाका सुरू केला आहे. नवी मुंबईमधील समाजवादी पक्षालाही खिंडार पडले असून पक्षाच्या जिल्हा अध्यक्षासह पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
नेरूळमध्ये आयोजीत शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये समाजवादी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुलीम मुल्ला, एम. एच. खान व अब्दुल शेख यांनी पक्षात प्रवेश केला. शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील सर्व समाज घटकांना सोबत घेवून विकास कामे करत आहेत. विकासावर आधारीत राजकारण व समाजकारणाला प्राधान्य दिले जात आहे. नवी मुंबईमधील समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जात आहे. यामुळे पक्षामध्ये येणारांची संख्या वाढत आहे. समाजवादी पक्षासह अनेकांनी पक्षात प्रवेश केला आहे. येणाऱ्या काळात शिल्लक सेनेतील अनेक चांगले कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्याच्या विकासासाठी सरकारने घेतलेल्या निर्यणांचा लाभ सामान्य नागरिकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी ठाकरे गटाचे शिरीष पाटील, जोतीराम भालेकर, राजेश भगत, स्वानंद शिंदे, विनायक धनावडे, सुनीता भोसले, वंचित बहुजन आघाडीचे सिद्धार्थ साळवे यांनीही प्रवेश केला. पक्षाचे सहसंपर्क प्रमुख संजय भोसले यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. शहर प्रमुख विजय माने, उपजिल्हा प्रमुख दिलीप घाडेकर, मिलींद सुर्याराव, ज्ञानेश्वर सुतार, चंद्रकांत आगोंडे, रामाशेठ वाघमारे यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.