शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
2
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
3
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
4
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
5
IND vs NZ : कसोटी जिंकण्याची गॅरंटी किती? रेकॉर्ड बघून म्हणाला; "टीम इंडिया है तो मुमकिन है"
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!
7
महागड्या प्लॅनचे टेन्शन संपले, Jio चा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'सांगोला'मध्ये ठाकरेंविरोधात पुन्हा 'सांगली पॅटर्न'?
9
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार? निवडणूक आयोगाने योजना रोखली
10
IND vs NZ : भारताने ५४ धावांत ७ गडी गमावले; सुवर्णसंधी हुकली, विजयासाठी न्यूझीलंडसमोर खूप सोपे आव्हान
11
महाविकास आघाडीला झटका! अखिलेश यादवांनी चार उमेदवार केले जाहीर
12
झारखंडमध्ये निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; पोलीस महासंचालकांना हटविले
13
माढ्यात तुतारीबाबतचा संभ्रम कायम; चार इच्छुक शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानंतर काय घडलं? 
14
"प्रत्यार्पण करण्यास नकार दिला तर..."; शेख हसीना प्रकरणात बांगलादेशचा भारताला इशारा
15
Scorpio पेक्षा महागडी आहे 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत पाहून तुमचा विश्वास बसणार नाही
16
"राणा हे आमदार नव्हे, तर सावकार आहेत", रवी राणांवर भाजपच्या तुषार भारतीयांचा हल्लाबोल
17
२० हून अधिक विमानांना धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क; जयपूरमध्ये एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
18
गौरवास्पद! विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
19
IND vs NZ : टीम इंडियानं ३५६ धावांची पिछाडी भरून काढत रचला खास रेकॉर्ड; आता...
20
आटपाडीच्या ओढ्याला ५०० च्या जुन्या-नव्या नोटांचा पूर आला; नागरिकांनी लुटल्या लाखोंच्या नोटा

Navi Mumbai: लाच घेताना वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला अटक  

By सूर्यकांत वाघमारे | Published: October 09, 2024 6:11 PM

Navi Mumbai News: एनआरआय पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश कदम यांना लाचलुचपत विभागाने मंगळवारी मध्यरात्री अटक केली. इमारत दुर्घटना प्रकरणात गुंतवणूकदारला अटक करून त्याच्या मुलाकडे ५० लाखाची मागणी केली होती.

नवी मुंबई  - एनआरआय पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश कदम यांना लाचलुचपत विभागाने मंगळवारी मध्यरात्री अटक केली. ईमारत दुर्घटना प्रकरणात गुंतवणूकदारला अटक करून त्याच्या मुलाकडे ५० लाखाची मागणी केली होती. त्यामध्ये १४ लाख घेतल्यानंतर अधिक १२ लाखाची मागणी करुन ४ लाख रुपये घेताना कारवाई करण्यात आली.

शाहबाज गाव येथे इमारत ढासळल्याची घटना सप्टेंबर महिन्यात घडली होती. या दुर्घटने प्रकरणी जागा मालक, विकासक यांच्यासोबत गुंतवणूकदार महेश कुंभार याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र महेश कुंभार यांचा दुर्घटनेशी संबंध नसतानाही त्यांना जाणीवपूर्वक अडकवले गेल्याचा कुटुंबीयांचा आरोप होता. या गुन्ह्यात सहकार्यासाठी एनआरआय पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश कदम यांनी कुंभार यांच्याकडे ५० लाख रुपये मागितल्याचा आरोप आहे. तडजोड अंती त्यांनी १२ लाख रुपये स्वीकारले होते असेही तक्रारदाराचा आरोप आहे. त्यानंतर कुंभार यांच्यावर इतर एक कारवाईचा धाक दाखवून त्यांच्या मुलाकडे १२ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. तडजोड करुन ४ लाख रुपये घेण्याची तयारी कदम यांनी दाखवली होती. मात्र पैशांसाठी त्यांच्याकडून सतत होत असलेल्या त्रासाला कंटाळून तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या मुंबईच्या मुख्य विभागाकडे तक्रार केली होती. त्यावरून मंगळवारी मध्यरात्री उलवे येथे सतीश कदम यांच्या राहत्या परिसरात सापळा रचून लाचेचे ४ लाख रुपये घेताना त्यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी पहाटेच्या सुमारास एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस