Navi Mumbai: नवी मुंबईत 267 ठिकाणी श्रमदान, हजारो नागरिकांचा सहभाग; शहर स्वच्छतेचा केला निर्धार
By नामदेव मोरे | Published: October 1, 2023 02:27 PM2023-10-01T14:27:42+5:302023-10-01T14:29:45+5:30
Navi Mumbai: स्वच्छता ही सेवा उपक्रमाअंतर्गत नवी मुंबईत जवळपास २६७ ठिकाणी श्रमदान मोहिमेचे आयोजन केले होते. लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थ्यांसह हजारो शहरवासीयांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
- नामदेव मोरे
नवी मुंबई - स्वच्छता ही सेवा उपक्रमाअंतर्गत नवी मुंबईत जवळपास २६७ ठिकाणी श्रमदान मोहिमेचे आयोजन केले होते. लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थ्यांसह हजारो शहरवासीयांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
स्वच्छता अभियानाला नवी मुंबई महानगर पालिकेने चळवळीचे स्वरूप दिले आहे. शहरस्वच्छतेसाठीच्या उपक्रमांना नागरिकांचा प्रतिसाद ही वाढत आहे. १ ऑक्टोबर ला शहरात २६७ ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रोड, चौक, मैदाने, खाडीकिनारे, मार्केट परिसरात सकाळी १० ते ११ स्वच्छता करण्यात आली. महानगर पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी स्वतः अभियानात सहभागी होऊन रस्ता साफ केला. आमदार गणेश नाईक यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधीही अभियानात सहभागी झाले. नागरिकांनीही या उपक्रमात सहभाग घेतला. वर्षभर शहर स्वच्छतेमध्ये सहभागी होण्याचा संकल्प केला. सीवूड रेसीडेन्स वेल्फेअर असोसिएशन, हेलन केलर संस्था, शहरातील सर्व सामाजीक संस्थांचे प्रतिनिधी, सदस्य या अभियानात सहभागी झाले होते.