Navi Mumbai: सोशल मीडियावरील मैत्री पडली २८ लाखाला, डॉक्टर महिलेची फसवणूक
By सूर्यकांत वाघमारे | Published: July 3, 2024 07:16 PM2024-07-03T19:16:56+5:302024-07-03T19:17:52+5:30
Navi Mumbai News: सोशल मीडियावरील मैत्री एका डॉक्टर महिलेला २८ लाखाला पडली आहे. या विदेशी व्यक्तीला कस्टमच्या तावडीतून सोडवण्याच्या प्रयत्नात त्यांनी हि रक्कम गमावली आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात त्याच त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे.
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - सोशल मीडियावरील मैत्री एका डॉक्टर महिलेला २८ लाखाला पडली आहे. या विदेशी व्यक्तीला कस्टमच्या तावडीतून सोडवण्याच्या प्रयत्नात त्यांनी हि रक्कम गमावली आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात त्याच त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे.
पनवेल परिसरात राहणाऱ्या डॉक्टर महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. या महिलेची सोशल मीडियाद्वारे एका विदेशी व्यक्तीसोबत ओळख झाली होती. यावेळी सदर व्यक्तीने तो देखील डॉक्टर असून घटस्फोटित असल्याचे सांगितले होते. त्यांच्यात चांगली मैत्री झाली असता त्या व्यक्तीने आपण मुलासह भारतात येत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काहीच दिवसात त्या व्यक्तीने आपण दिल्ली विमानतळावर अडकलो असून आपल्याला कस्टम अधिकाऱ्यांनी पकडले असल्याचे सांगितले.
आपल्यासोबत मोठ्या प्रमाणात विदेशी चलन असून ते सोडवण्यासाठी आव आपल्यावरील कारवाई टाळण्यासाठी त्याने डॉक्टर महिलेकडे मदत मागितली. यावेळी सोशल मीडियाद्वारे झालेल्या मित्राबद्दल सहानभूती दाखवत या महिलेने कथित कस्टम अधिकाऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे वेगवेगळ्या खात्यावर २८ लाख रुपये भरले. त्यानंतर मात्र अधिक पैशाची मागणी होऊ लागल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली असून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.