नवी मुंबईची पाणी चिंता मिटली; मोरबे धरणाने गाठली अत्युच्च १०० टक्के पातळी

By नारायण जाधव | Published: September 24, 2023 10:44 AM2023-09-24T10:44:41+5:302023-09-24T10:45:04+5:30

यावर्षी मोरबे धरण प्रकल्प क्षेत्रात आजतागायत 3540.00 मि.मि. पावसाची नोंद झाली.

Navi Mumbai water worries solved; Morbe dam reached the highest 100 percent level | नवी मुंबईची पाणी चिंता मिटली; मोरबे धरणाने गाठली अत्युच्च १०० टक्के पातळी

नवी मुंबईची पाणी चिंता मिटली; मोरबे धरणाने गाठली अत्युच्च १०० टक्के पातळी

googlenewsNext

नवी मुंबई :यावर्षी समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचा प्रतिदिन 450 द.ल.लि. क्षमतेचा मोरबे धरण प्रकल्प संपूर्ण 100% भरला असून 88 मीटर ही जलसाठ्याची सर्वोच्च पातळी पार केल्याने आज 24 सप्टेंबर रोजी रात्री 1.30 वाजता सांडव्याचे दोन्ही दरवाजे 15 से.मी. उघडण्यात आलेले आहेत व‌ 675 क्युसेक इतका विसर्ग सांडव्यातून सुरु झाला आहे. 

यावर्षी मोरबे धरण प्रकल्प क्षेत्रात आजतागायत 3540.00 मि.मि. पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत 190.890 द.ल.घ.मी. पाणी साठा उपलब्ध होऊन मोरबे धरण पूर्ण भरल्याने नवी मुंबई जलसमृध्द झाली आहे. यावर्षी उत्तम पर्जन्यवृष्टीमुळे मोरबे धरण संपूर्ण क्षमतेने भरले असून गणेशोत्सवामध्ये नवी मुंबईकरांना मिळालेली ही मोठी भेट असल्याचे सांगत नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच आसपासच्या शहरांतील जलस्थिती लक्षात घेता  पिण्याच्या पाण्याचे महत्व लक्षात घेऊन पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर करण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Navi Mumbai water worries solved; Morbe dam reached the highest 100 percent level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.