- नारायण जाधव (उप-वृत्तसंपादक)नवी मुंबईतील शिरवण्याच्या निधी डान्स बारवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यानंतर लेडीज आणि डान्स बारचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्यात ज्या बारवरून डान्स बारबंदीची घोषणा तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली होती, तो डान्स बारही नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील मुंबई- पुणे महामार्गावरील कोनगावातील होता.
डान्स बार बंदीनंतर सुरुवातीचा काही काळ वगळता शहरातील डान्स बार पुन्हा एकदा नव्या जोमाने पहाटे उशिरापर्यंत सुरू आहेत. किंबहुना ते पूर्वीपेक्षा अधिक जोमाने सुरू आहेत. यामुळे नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी शहरातील लेडीज आणि डान्सना कुणाचा आशीर्वाद 'आहे, खात्यातील 'विवेक' सोडून तोंड 'काळे' करणारे कोणते अधिकारी त्यात विशेष रस घेतात, याचा शोध घेतल्यास त्यांना अनेक रहस्यमय गोष्टी निर्दशनास येतील. खालच्या • अधिकाऱ्यांवर विसंबून न राहता त्यांनी स्वतः लक्ष घातले, तरच हजारो संसार उद्ध्वस्त करणारी ही बार संस्कृती संपवता येईल.
न्यायालयाने काही अटी व शर्तीवर बारना परवानगी दिली; परंतु या अटी आणि शर्तींना ठाणे खाडीत बुडवून आज नवी मुंबईत १५० च्या आसपास बार, १०० च्यावर क्लब सुरू आहेत. यात अनेक शासकीय आणि पोलिस अधिकारी स्लीपिंग पार्टनर असल्याची कोननजीकच्या एका बारबाबत चर्चा आहे.
पनवेलचे तत्कालीन आमदार विवेक पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी बारबंदीची घोषणा केली होती. यावरून राज्यभर गहजब झाला होता. नंतर बारमालक न्यायालयात गेले.
कोपरखैरण्यात नटराज, मेट्रो हे बार निवासी इमारतीत सुरू आहेत. वाशी सेक्टर १७ मधील बार तर हॉस्पिटलला लागून आहेत. खाली बार आणि वर लॉजिंग, असे दृश्य अनेक ठिकाणी दिसते.
आबांसारखा वचक निर्माण व्हावायात पार्किंग कुठेच नाही. अनेक इमारती अनधिकृत आहेत. फायर ब्रिगेडचे परवाने नाहीत. सत्रा प्लाझा या इमारतीत जितके पब आणि हुक्का पार्लर असतील, तेवढे संपूर्ण एमएमआर क्षेत्रात नसतील. सानपाडा रेल्वे स्थानकाजवळ असंख्य मसाज पार्लर आहेत. पोलिस, उत्पादन शुल्क, महापालिका, जिल्हाधिकायांच्या नाकावर टिच्चून हे सर्व सुरु आहे. यामागे हप्तेखोरी असून, ती वसूल . करायला बारमालकांना राम राम बोलून पोळणारे सचिन, बंटी हे गुळवेलीसारखे कर्मचारी, तर बारमालकांतील मंजू, वाला याच्यासारखे दलाल आहेत. त्यांना वठणीवर आणण्यासाठी दिवंगत आर. आर. पाटील आबा यांच्यासारखा वचक निर्माण करण्याची गरज आहे.