नवी मुंबईचे सौंदर्य चित्रांमधून रेखाटणाऱ्यांचा आज होणार सन्मान;‘लोकमत’सह जीवनधाराचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 12:50 AM2020-02-02T00:50:42+5:302020-02-02T00:50:58+5:30
देशभक्तीपर गीतांसह लोकनृत्याचाही कार्यक्रम
नवी मुंबई : ‘लोकमत’ आणि जीवनधारा आयोजित चित्रभारती स्पर्धेतील विजेत्यांचा रविवारी विष्णुदास भावे नाट्यगृहात सन्मान करण्यात येणार आहे. या वेळी देशभक्तीपर गीत आणि लोकनृत्याच्या ‘विविध रंग एकात्मता के संग’ या कार्यक्रमाचेही आयोजन केले आहे.
चित्रभारती स्पर्धेमध्ये नवी मुंबईमधील १०५ शाळांमधील जवळपास २५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. नवी मुंबईची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दिशेने सुरू आहे. स्वच्छता स्पर्धेमध्ये राज्य व देशपातळीवर ठसा उमटविला आहे. २४ तास पाणीपुरवठा करणारे शहर, स्वत:च्या मालकीचे धरण, अत्याधुनिक मलनि:सारण केंद्र, सर्व शहरांमधून मलनि:सारण वाहिन्यांचे जाळे असलेले शहर अशीही नवी मुंबईची ओळख आहे.
देशातील राहण्यायोग्य सर्वोत्तम शहरांच्या यादीमध्येही महापालिकेचा समावेश आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छता स्पर्धेतील पहिल्या दोन तिमाहीमध्ये देशात तिसरा क्रमांक आला आहे. नवी मुंबईच्या अनेक प्रकल्पांची देशपातळीवर दखल घेतली असल्यामुळे यावर्षी माझे शहर हा विषय चित्रांसाठी देण्यात आला होता. विद्यार्थ्यांकडूनही या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला होता.
पाचवी ते दहावीपर्यंतच्या जवळपास २५ हजार विद्यार्थ्यांनी नवी मुंबईमधील सौंदर्यस्थळे चित्रातून रेखाटली आहेत. कुंंचल्यातून स्मार्ट सिटीची प्रतिमा रेखाटणाºया चित्रकारांचा २ फेब्रुवारीला सन्मान करण्यात येणार आहे.
विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमास ठाणे
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार गणेश नाईक, जीवनधाराचे प्रमुख व चित्रभारतीचे आयोजक माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, महापौर जयवंत सुतार, प्रीती सिंग, जाफर पिरजादा, गुरमीत गरहा,
सिंधू नायर, संजीव कुमार व इतर मान्यवर बक्षिस वितरण सोहळयास उपस्थित राहणार आहेत. या वेळी देशभक्तीपर गीत आणि लोकनृत्याचा कार्यक्रम विद्यार्थ्यांकडून सादर केला जाणार आहे.
दोन गटामध्ये स्पर्धा
पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली आहे. प्रथम क्रमांकासाठी १५ हजार, द्वितीय क्रमांकासाठी दहा हजार व तृतीय क्रमांकासाठी पाच हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.