नवी मुंबई : देशातील सर्वोत्तम सुविधा असणाऱ्या शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश आहे. स्वच्छता अभियानामध्ये राज्य व राष्ट्रीय पातळीवर शहराने स्वतंत्र ठसा उमटविला आहे. स्वत:च्या मालकीचे धरण व २४ तास पाणीपुरवठा करणा-या शहराचे आता चित्रांमधून दर्शन होणार आहे. ‘लोकमत’सह जीवनधारा आयोजित चित्र भारती स्पर्धेसाठी माझे शहर हा विषय निश्चित केला असून, १०५ शाळांमधील तब्बल २५ हजार विद्यार्थी त्यांच्या नजरेतील नवी मुंबईचे चित्र रेखाटणार आहेत.‘लोकमत’ व जीवनधाराच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना त्यांची कला सादर करण्यासाठी भव्य व्यासपीठ निर्माण व्हावे. त्यांच्या कुंचल्याला विचारांची जोड मिळून शहरातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार घडावे, यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. यावर्षी २४ ते २७ जानेवारी दरम्यान, ही स्पर्धा होत आहे. शहरातील १०५ शाळांमधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा होत आहे. प्रथम क्रमांकासाठी १५ हजार, द्वितीय क्रमांकासाठी दहा हजार व तृतीय क्रमांकासाठी पाच हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना २ फेब्रुवारीला वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात बक्षीस देण्यात येणार आहे. या वेळी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे देशभक्तीपर गीत आणि लोकनृत्याचा कार्यक्रम होणार आहे. माजी मंत्री व ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून जीवनधाराचे अध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक हा उपक्रम राबवत असून, नवी मुंबई कला संकुल व छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळाचाही याला सहयोग आहे. स्पर्धेची सुरुवात कोपरखैरणेमधील मदर इंडीया मिशनच्या शाळेत चित्रकलेसाठीचे अर्ज वाटून करण्यात आली. या वेळी जीवनधाराचे अजित कांडर व शाळेच्या मुख्याद्यापिका रजनी सुतार उपस्थित होत्या.नवी मुंबई महानगरपालिकेने २८ वर्षांच्या वाटचालीमध्ये शहराचा नावलौकिक वाढविणारे अनेक प्रकल्प उभारले आहेत. स्वातंत्र्यानंतर स्वत:च्या मालकीचे धरण विकत घेणारी एकमेव महानगरपालिका. २४ तास पाणीपुरवठा करणारे शहर. अत्याधुनिक मलनि:सारण केंद्र, शास्त्रोक्त पद्धतीने घनकचरा व्यवस्थापन, देशातील सर्वात चांगले ज्येष्ठ नागरिक धोरण, खासगी शाळांपेक्षाही चांगल्या महापालिकेच्या शाळा, सीबीएसई बोर्डाची शाळा, ईटीसी दिव्यांग शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्वात भव्य मुख्यालय अशी शहराची अनेक वैशिष्ट्ये आहेत. स्वच्छता स्पर्धेमध्येही देशपातळीवर ठसा उमटविला असून, शहराची ही वैशिष्ट्ये चित्रांमधून कॅनव्हासवर उमटावी, यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे.नवी मुंबई शहराची वैशिष्ट्येस्वत:च्या मालकीचे मोरबे धरण विकत घेतल्यामुळे २४ तास पाणीपुरवठा करणे शक्यप्रत्येक नोडनिहाय उद्यानांची निर्मिती, सद्यस्थितीमध्ये जवळपास २०० ठिकाणी उद्यान व हरित पट्ट्यांचा विकासस्वच्छता स्पर्धेत देश व राज्य स्तरावर लक्षणीय कामगिरीखासगी शाळांप्रमाणे महापालिकेच्या अत्याधुनिक सुविधा देणाºया शाळाशहरातील सर्व प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरणघनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठ्यासाठी देशात प्रथम क्रमांकज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारणारी पहिली महानगरपालिकादिवा ते दिवाळेपर्यंत समृद्ध व खारफुटीचे जंगल असणारा खाडीकिनारारेल्वेसह रस्ते वाहतुकीसाठीची उत्तम जाळेराज्यातील सर्वात औद्योगिक पट्टा असणारे शहरउद्यान, मैदानांसह नागरिकांना सर्वोत्तम नागरी सुविधादिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शाळा सुरू करणारी एकमेव महापालिका
चित्रांतून होणार नवी मुंबईचे दर्शन, ‘लोकमत’सह जीवनधाराचा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 1:46 AM