शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

नवी मुंबई : विमानतळाच्या कामात खंड पडणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 2:27 AM

देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सिडकोने कामाला गती दिली आहे.

कमलाकर कांबळेनवी मुंबई : देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाचे काम सुरू करण्यात आले आहे. प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने सिडकोने कामाला गती दिली आहे. परंतु शनिवारी उलवे टेकडीच्या उत्खननासाठी पेरलेल्या सुरुंगाच्या स्फोटात सहा जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे या उत्खननाच्या कामाला स्थानिक ग्रामस्थांचा असलेला विरोध आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे असले तरी विमानतळाच्या कामात कोणताही खंड पडू दिला जाणार नाही, असे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.माहिती व तंत्रज्ञानाचे एक आधुनिक शहर म्हणून नवी मुंबईची जागतिक स्तरावर ओळख निर्माण झाली आहे. आता प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाची भर पडली आहे. विमानतळ प्रकल्पामुळे नवी मुंबईला ख-या अर्थाने ग्लोबल लूक प्राप्त होणार आहे. देशातील पहिले ग्रीन फिल्ड विमानतळ म्हणून या विमानतळाला मान मिळणार आहे. या विमानतळाच्या विकासासाठी आवश्यक अशा महत्त्वाच्या सर्व परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. या विमानतळाच्या उभारणीसाठी जीव्हीके या कंपनीची ठेकेदार म्हणून निवड करण्यात आली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात दोन हजार कोटी रुपयांची प्रकल्पपूर्व कामे सुरू करण्यात आली आहे. यात नदीचे पात्र बदलणे, उलवे टेकडीची उंची कमी करणे, उच्च विद्युत दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे आणि जमिनीचे सपाटीकरण आदी कामांचा प्रामुख्याने समावेश आहे.विशेष म्हणजे भूसंपादन आणि पुनर्वसनाचा प्रश्न सुध्दा मार्गी लागला आहे. विमानतळाच्या गाभा क्षेत्रात असणाºया दहा गावांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू आहे, परंतु वरचे ओवळा गावातील ग्रामस्थांचा स्थलांतराला संमिश्र विरोध आहे. टेकडीच्या उत्खननामुळे गावांतील घरांना तडे जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.या विरोधात येथील ग्रामस्थांनी तीन दिवसांपूर्वी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली सिडकोवर मोर्चा काढला होता. यातच ही दुर्घटना घडल्याने हा विरोध आणखी तीव्र होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.तसे झाल्यास टेकडी उत्खननाच्या कामाला खीळ बसून त्याचा फटका संपूर्ण विमानतळ प्रकल्पाला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे असले तरी प्रकल्पपूर्व कामांत कोणताही खंड पडू दिला जाणार नाही, असे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.सहकार्य करण्याचे सिडकोचे आवाहन उलवे टेकडीचे काम अत्यंत नियोजनबद्धरीत्या सुरू आहे. हे काम अत्यंत जोखमीचे असल्याने सुरक्षिततेची काळजी घेण्यात येत आहे. त्यातही शनिवारची दुर्दैवी घटना घडली. भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, गावांनी स्थलांतरित होणा-या गावांतील अनेक ग्रामस्थांनी संमतीपत्रे दिली आहेत. पुनर्वसन आणि पुन:स्थापन योजनेअंतर्गतचा लाभ ही स्वीकारला आहे. त्यानंतरही प्रत्यक्ष स्थलांतर केले जात नसल्याचे दिसून आले आहे. ही बाब विमानतळ प्रकल्पाच्या मार्गात अडथळा निर्माण करणारी असल्याने ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ