नवी मुंबईकरांचा बुधवारचा दिवसही पाण्याविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 04:49 AM2018-08-02T04:49:34+5:302018-08-02T04:49:42+5:30

ऐन पावसाळ्यात शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मोरबे धरणाच्या भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठा यंत्रणेत बिघाड झाल्याने सोमवारपासून शहराला अनियमित पाणीपुरवठा होत आहे.

 Navi Mumbaikars do not have any water on Wednesday | नवी मुंबईकरांचा बुधवारचा दिवसही पाण्याविनाच

नवी मुंबईकरांचा बुधवारचा दिवसही पाण्याविनाच

Next

नवी मुंबई : ऐन पावसाळ्यात शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मोरबे धरणाच्या भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठा यंत्रणेत बिघाड झाल्याने सोमवारपासून शहराला अनियमित पाणीपुरवठा होत आहे. बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी नागरिकांचे हाल झाले. विशेष म्हणजे गुरुवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेच्या संबंधित विभागाने जाहीर केले आहे.
महापालिका स्वमालकीच्या मोरबे धरणातून शहराला पाणीपुरवठा करते. मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने धरण काठोकाठ भरले आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. असे असले तरी केवळ तांत्रिक अडचणीमुळे शहरवासीयांना मागील तीन दिवसांपासून पाणीटंचाईची झळ सहन करावी लागत आहे. भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठा करणाºया रोहित्रात सोमवारी बिघाड झाला. त्याच्या दुरुस्तीनंतरही पुन्हा अडचणी निर्माण झाल्याने मंगळवारी कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात आला. मंगळवारी रात्रीपर्यंत दुरुस्तीचे हे काम सुरू होते. मात्र, तांत्रिक अडचणी वाढल्याने बुधवारीसुद्धा शहरवासीयांचा नियमित पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. गुरुवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, सलग तीन दिवस अनियमित पाणीपुरवठा झाल्याने रहिवाशांचे हाल झाले. विशेषत: चाकरमानी आणि विद्यार्थ्यांची कसरत झाली. पिण्यासाठी अनेकांना बिस्लरी बाटल्यांचा वापर करावा लागला, तर त्या त्या विभागातील जलकुंभाच्या बाहेर पाण्यासाठी रहिवाशांची रीघ लागल्याचे दिसून आले.

Web Title:  Navi Mumbaikars do not have any water on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.