वाहतूककोंडीतून नवी मुंबईकरांची होणार सुटका; उड्डाणपुलांसह महामार्गांना आर्म ब्रिजने जोडणार

By नारायण जाधव | Published: February 20, 2024 07:04 PM2024-02-20T19:04:49+5:302024-02-20T19:05:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क,  नवी मुंबई : टीसीसी औद्योगिक वसाहत, एपीएमसी मार्केटसह वाढते नागरीकरण, औद्योगिक क्षेत्रात दिवसेंदिवस वाढत जाणारे डेटा ...

Navi Mumbaikars will be freed from traffic jams; Arm bridges will connect highways with flyovers | वाहतूककोंडीतून नवी मुंबईकरांची होणार सुटका; उड्डाणपुलांसह महामार्गांना आर्म ब्रिजने जोडणार

वाहतूककोंडीतून नवी मुंबईकरांची होणार सुटका; उड्डाणपुलांसह महामार्गांना आर्म ब्रिजने जोडणार

लोकमत न्यूज नेटवर्क, 
नवी मुंबई : टीसीसी औद्योगिक वसाहत, एपीएमसी मार्केटसह वाढते नागरीकरण, औद्योगिक क्षेत्रात दिवसेंदिवस वाढत जाणारे डेटा सेंटरचे जाळे यामुळे नवी मुुंबई महापालिका क्षेत्रात ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरांतून जाणारे महामार्ग आणि बहुतांश अंतर्गत रस्त्यांवर रेाजच वाहतूक कोंडी होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने येत्या वर्षात रस्त्यांची नवी कामे घेतल्याने शहरवासीयांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होणार आहे.

वाशी, सेक्टर १७ पामबीच मार्गावर सायन पनवेल महामार्गावर २९० मीटर लांब व ६.५० मीटर रुंदीचा उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू असून त्यामुळे नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचून इंधनाचीही बचत होणार आहे.

ऐरोली विभागातील मध्यवर्ती नाल्यावरील बसडेपो, सेक्टर ३, श्रीराम स्कूल, सेक्टर १९ लगतच्या एकूण ४ कल्व्हर्टची पुनर्बांधणी, दुरुस्ती व सुधारणा प्रस्तावित आहे.

महापे उड्डाण आर्म : महापे उड्डाणपुलावरून ठाणे-बेलापूर रस्त्यावर जाण्यासाठी आर्म बांधण्याच्या कामास प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली असून त्या कामाच्या निविदा मागविण्यात येणार आहेत.

बेलापूर विभागातील आम्रमार्ग ते से. ११, १५, दिवाळेगांवमार्गे सायन –पनवेल महामार्गाला जोडण्यासाठी पूल आणि नेरूळ फेज -१ सेक्टर २१ ते सेक्टर २८ जोडण्याकरिता पुलाच्या कामाचा व्यवहार्यता अहवाल तयार केला असून त्याकरिता रक्कम २२० कोटी खर्च अपेक्षित आहे. तसेच त्यापैकी ५० खर्चाची सिडकोकडे मागणी केलेली आहे.
.....
तुर्भे पुलाला फायझर कंपनीकडील रस्त्याला जोडण्यासाठी मार्ग बांधण्याकरिता यासंबंधी तांत्रिक व वित्तीय अहवाल तयार केला असून त्यामध्ये सल्फर कंपनीची ९ मीटर जागा संपादित करावी लागत असल्याने त्यामध्ये बदल करून ठाणे-बेलापूर रस्त्यावरून सायन पनवेल ब्रिजवर आर्म उभारणे प्रस्तावित आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होणार असून यासाठी १२६ कोटी खर्च अपेक्षित असून एमएमआरडीएकडे निधीची मागणी केली.
........
कोपरखैरणे व घणसोली या नोडमधील अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी मोकळे राहण्यासाठी ठाणे-बेलापूर रस्त्यावरुन महापे पुलापासून ते घणसोली येथील पामबीचपर्यंत पूल बांधणे (दुसरे आर्म) आवश्यक असल्याने त्याकरिता ४ हजार चौ.मी. भूखंडाची मागणी एमआयडीसीकडे केलेली आहे.
...............
घणसोली-ऐरोली खाडीपुलासह रस्त्याचा खर्च १६८ कोटींनी वाढला
घणसोली-ऐरोली खाडीपूल व रस्ता : मागील १५ वर्षे प्रलंबित असलेल्या घणसोली रस्ता व ऐरोलीला जोडणारा खाडी पूल बांधण्याबाबत महानगरपालिकेने नियोजन केले आहे. नव्या नियोजनात १.९५ कि.मी. ऐवजी ३.४७ कि.मी. चा रस्ता व खाडी पूल बांधून हा रस्ता काटई -ऐरोली रस्त्याला जोडण्याचे नियोजन आहे. त्यासाठी पर्यावरण विभागाच्या आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या असून या प्रकल्पाचा खर्च ३७२ कोटी ऐवजी ५४० कोटी अपेक्षित आहे. प्रकल्पाच्या बांधकाम खर्चापैकी ५० टक्के खर्च म्हणजे २७० कोटी रक्कम सिडको देणार आहे. प्रकल्पाच्या कामाची निविदा काढली असून, एप्रिल २०२४ अखेरपर्यंत कामास सुरुवात करण्यात येईल. या रस्त्यासह खाडी पुलामुळे घणसोलीकडून कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरकडे व मुलुंडमार्गे मुंबईकडे जाणे-येणे सोयीचे होणार आहे.

Web Title: Navi Mumbaikars will be freed from traffic jams; Arm bridges will connect highways with flyovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.