पावसाच्या कृपादृष्टीने नवी मुंबईचा हवा निर्देशांक सुधारला, धुलिकणांचे प्रमाण कमी झाल्याने शहरवासीयांना दिलासा

By नामदेव मोरे | Published: January 10, 2024 05:36 PM2024-01-10T17:36:43+5:302024-01-10T17:37:00+5:30

Navi Mumbai: मंगळवारी रात्री पडलेला अवकाळी पाऊस प्रदूषणामुळे त्रस्त नवी मुंबई शहरवासीयांच्या नवी मुंबईसह पनवेलवासीयांच्या पथ्यावर पडला आहे. पावसामुळे शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारला असून, प्रत्येक विभागातील धुलिकणांचे प्रमाण कमी झाले आहे.

Navi Mumbai's air index has improved thanks to the rains, the city dwellers are relieved as the amount of dust has reduced | पावसाच्या कृपादृष्टीने नवी मुंबईचा हवा निर्देशांक सुधारला, धुलिकणांचे प्रमाण कमी झाल्याने शहरवासीयांना दिलासा

पावसाच्या कृपादृष्टीने नवी मुंबईचा हवा निर्देशांक सुधारला, धुलिकणांचे प्रमाण कमी झाल्याने शहरवासीयांना दिलासा

- नामदेव मोरे
नवी मुंबई - मंगळवारी रात्री पडलेला अवकाळी पाऊस प्रदूषणामुळे त्रस्त नवी मुंबई शहरवासीयांच्या नवी मुंबईसह पनवेलवासीयांच्या पथ्यावर पडला आहे. पावसामुळे शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारला असून, प्रत्येक विभागातील धुलिकणांचे प्रमाण कमी झाले आहे. पहाटेपासून शुद्ध हवेत श्वास घेता आल्यामुळे नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे.

 तळोजासह ठाणे बेलापूर एमआयडीसी, सायन-पनवेल, जेएनपीटी महामार्गासह अनेक प्रमुख रस्ते, विमानतळासह मोठ्या प्रमाणात सुरू असलेली बांधकामे यामुळे नवी मुंबईमधील प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. हवेतील धुलिकण वाढले असून, हवा गुणवत्ता निर्देशांक खालावत चालला आहे. मंगळवारी शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक १५२ एवढा होता. रात्री पाऊस पडल्यामुळे सर्व रस्ते व मोकळ्या भूखंडावरील धुलिकण खाली बसले. यामुळे बुधवारी हवा गुणवत्ता निर्देशांक ९५ वर आला. प्रत्येक विभागातील प्रदूषण कमी झाले आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान हाेत असले तरी नवी मुंबईकरांच्या मात्र हा पाऊस पथ्यावर पडला आहे. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांनीही शुद्ध हवेमुळे समाधान व्यक्त केले. महानगरपालिकांसह सर्वच शासकीय संत्रणांनी थोडा वेळ पाऊस पडल्यानंतर हवा गुणवत्ता निर्देशांक कसा सुधारला व इतर वेळीही प्रदूषण कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचा अभ्यास करावा, अशी मागणीही सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पवार यांनी केली आहे.
 
नवी मुंबईमधील विभागनिहाय हवेचा निर्देशांक
विभाग - ९ जानेवारी - १० जानेवारी
कोपरी - १२६ - ९२
महापे १३६ - ९९
नेरूळ १२३ - ६९
सानपाडा १२२ - ८८
कळंबोली - १९४ - ८६
तळोजा १४४ - ८५

Web Title: Navi Mumbai's air index has improved thanks to the rains, the city dwellers are relieved as the amount of dust has reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.