मुुंढे पॅटर्नमुळे नवी मुंबईचा मेकओव्हर

By admin | Published: September 23, 2016 03:55 AM2016-09-23T03:55:56+5:302016-09-23T03:55:56+5:30

स्मार्ट सिटी स्पर्धेमध्ये सहभाग नसला तरी या स्पर्धेमधील सर्व निकष पूर्ण करण्यामध्ये नवी मुंबईने आघाडी घेतली आहे.

Navi Mumbai's makeover because of its latest pattern | मुुंढे पॅटर्नमुळे नवी मुंबईचा मेकओव्हर

मुुंढे पॅटर्नमुळे नवी मुंबईचा मेकओव्हर

Next

नवी मुंबई : स्मार्ट सिटी स्पर्धेमध्ये अद्याप सहभाग नसला तरी या स्पर्धेमधील सर्व निकष पूर्ण करण्यामध्ये नवी मुंबईने आघाडी घेतली आहे. २१ सेवा आॅनलाइन करणारी राज्यातील ही पहिलीच महापालिका ठरली आहे. ई- गव्हर्नसमध्ये आघाडी घेतली आहे. स्वच्छ भारत अभियानासह उत्पन्नवाढीमध्येही लक्षणीय कामगिरी केली आहे. सहा महिन्यांत ७३७ कोटी रूपये कर वसूल केला असून गतवर्षीपेक्षा तब्बल १७२ कोटी जादा वसुली केली आहे.
महानगरपालिकेने सहा महिन्यांत केलेल्या कामांविषयी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. महापालिकेचा कारभार अधिक लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उत्पन्नवाढीवरही विशेष लक्ष दिले जात आहे. गतवर्षी मालमत्ता कर विभागाने सहा महिन्यांमध्ये २०५ कोटी रूपयांचा महसूल जमा केला होता. यावर्षी हा आकडा २७० कोटी रूपये झाला आहे. याशिवाय ५६७२ मालमत्ताधारकांना नोटीस देण्यात आली आहे. एलबीटी विभागाची वसुली ३६० कोटी होती ती ४६७ कोटी रूपये झाली असून ४६ कोटी जुन्या थकबाकीचा समावेशही आहे. ई- गव्हर्नसमध्येही मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली असून २१ सेवा आॅनलाइन केल्या आहेत. याशिवाय पेमेंट गेटवे, तक्रार निवारण प्रणाली अद्ययावत केली आहे.
महापालिकेच्या संकेत स्थळामध्येही बदल केला असून त्यावरील माहितीही अद्ययावत केली जात आहे. महापालिकेची आरोग्य यंत्रणा कोलमडली होती. परंतु गत चार महिन्यांमध्ये ऐरोली व नेरूळमधील नवीन रूग्णालये सुरू केली आहेत. अस्थिव्यंग, दंतचिकित्सा व इतर विभाग सुरू करण्यात आले आहेत. उर्वरित विभागही लवकरच सुरू केले जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानामध्येही नवी मुंबईने आघाडी घेतली आहे. महापालिकेस शौचालयांचे ३३९८ एवढे सुधारित उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय मिळून १८५० सीट्सचे बांधकाम करायचे आहे. मनपा क्षेत्रामध्ये ४४८ सार्वजनिक शौचालये आहेत. हागणदारीमुक्त शहर बनविण्यासाठीचे उद्दिष्ट लवकरच साध्य केले जाईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. शहरातील १११ पैकी ८५ प्रभाग हागणदारीमुक्त करण्यात यश आले आहे. घनकचरा व्यवस्थापनाच्या कामकाजामध्येही महापालिकेने देशात सर्वात चांगले काम केले आहे.
ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घेतल्याने आता नागरिकही कचऱ्याचे वर्गीकरण करू लागले आहेत. वर्गीकरणाची सक्ती केल्यानंतर १०० मेट्रिक टन सुका व जवळपास ५० मेट्रिक टन ओला कचरा वेगळा होवून येत असल्याने त्यावर प्रक्रिया करणे सुलभ झाले आहे. भविष्यात शहराचा नावलौकिक वाढविण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जाणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले आहे.

स्वच्छ महाराष्ट्र
अभियानात आघाडी
स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची सर्वात प्रभावी अंमलबजावणी
१११ पैकी ८५ प्रभाग हागणदारीमुक्त करण्यात यश
एमआयडीसीकडे शौचालय उभारणीसाठी ७९ भूखंडांची मागणी
एप्रिलपासून शहरात ८७ ठिकाणी विशेष स्वच्छता मोहिमांचे आयोजन
उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर नियमित कारवाई
जुन्या ४३९ पैकी २०७ शौचालयांची दुरूस्ती

Web Title: Navi Mumbai's makeover because of its latest pattern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.