रायगडमध्ये सिडको उभारणार नवनगर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 06:27 AM2019-01-26T06:27:49+5:302019-01-26T06:30:28+5:30
रायगड जिल्ह्यात ‘नैना’नंतर रोहा, अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यांतील ४० गावांत सिडको नवनगर उभारणार असून, त्यासाठी तेथील १९,१४६ हेक्टर जमीन घेतली जाणार आहे.
नवी मुंबई : रायगड जिल्ह्यात ‘नैना’नंतर रोहा, अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यांतील ४० गावांत सिडको नवनगर उभारणार असून, त्यासाठी तेथील १९,१४६ हेक्टर जमीन घेतली जाणार आहे.
ठाणे, रायगड जिल्ह्यातील ९५ गावांत नवी मुंबई उभारल्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर अर्थात, ‘नैना’च्या विकासाची जबाबदारी सिडकोवर सोपविण्यात आली. ‘नैना’त ठाणे, उरण, कर्जत, पेण, खालापूर व पनवेल तालुक्यांतील २७० गावांचा समावेश आहे. आता रोहा, अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यांतील ४० गावांत नवनगर वसविले जाणार आहे.
या परिसराचे आराखडे, विकासाचे नियोजन सिडको करेल. त्याची अधिसूचना १९ जानेवारीला काढण्यात आली आहे. त्यानुसार, तेथे कार्यालय स्थापन करण्यापासून सर्व कामांना आता वेग
येईल. नवी मुंबईमुळे विकासाचा पहिला टप्पा पार पडला. नैनामुळे दुसऱ्या टप्प्यातील विकासाची कामे सुरू आहेत. आता येऊ घातलेल्या नवनगरामुळे रायगडमधील तिसºया टप्प्यातील विकासाची प्रक्रिया
सुरू होईल आणि तो थेट रोहा,
अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन या तालुक्यांपर्यंत
पोहोचेल.