मधुकर ठाकूर
उरण : येथील नौदलाच्या तुणीर बेस कॅम्पच्या जवळच असलेल्या डोंगराला बुधवारी ( ९) सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास आग लागली. अतिशय संवेदनशील असलेल्या ठिकाणी लागलेली आग विझवण्यासाठी नौदलाचे चार तर सिडकोचा एक असे पाच बंब आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच नौदलाचे अन्य १२ जवानही फोम, पाण्याचा वापर करून आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत करीत होते.
रात्री आठ वाजेपर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली असली तरी अद्यापही पुर्णता विझली नव्हती.या आगीत सुमारे ८०० मीटरचा लांबीचा पट्ट्यातील झाडे झुडपे जळून नष्ट झाली आहेत. या डोंगराच्या शेजारीच झोपडपट्टी वसली आहे.या वस्तीकडील गवताला लागलेली आग नंतर भडकली असल्याचे नौदलाच्या जवानांकडून सांगण्यात आले.आग पुर्णता आटोक्यात आणण्यासाठी आणखी तासाभराचा काळावधी लागण्याची शक्यता अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केली आहे.