पनवेलमधील गावठाणात नालेसफाई रखडली
By admin | Published: June 13, 2017 03:32 AM2017-06-13T03:32:51+5:302017-06-13T03:32:51+5:30
पनवेल महापालिका क्षेत्रात सिडको वसाहतीसह पनवेल शहरात नालेसफाईची कामे जोरदार सुरू आहेत. पालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे स्वत: रस्त्यावर उतरून मान्सूनपूर्व
- लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात सिडको वसाहतीसह पनवेल शहरात नालेसफाईची कामे जोरदार सुरू आहेत. पालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे स्वत: रस्त्यावर उतरून मान्सूनपूर्व कामांची पाहणी करीत आहेत. शहरी भागात मान्सूनपूर्व नालेसफाई योग्यरीत्या होत असली तरी गावठाणात मात्र अद्यापही कामे रखडली असल्याचे दिसून येत आहे.
पनवेल महापालिकेत २३ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी ग्रामपंचायतीमार्फत गावातील अंतर्गत गटारे, नाल्यांची सफाई केली जायची.
पनवेल महापालिकेत खारघर, कामोठे, कळंबोली तसेच घोट, तळोजा, पेंधर यासारख्या शहर व औद्योगिक वसाहतीलगतच्या गावांचा समावेश आहे. शहरात नालेसफाईची कामे जोरात सुरू आहेत. मात्र पहिल्या पावसात ग्रामीण भागातील अंतर्गत गटारे, नाले तुंबलेले दिसत आहेत. पावसाने जोर धरण्यापूर्वी या परिसरातील नालेसफाई करण्याची गरज असल्याचे खारघर गावातील रहिवासी ज्ञानदेव म्हात्रे यांनी सांगितले.
कोपरा गावानजीक असलेल्या गटारांची सफाई योग्यरीत्या झाली नसल्याची तक्रार येथील रहिवासी तकदीर भोईर यांनी पनवेल महापालिकेच्या खारघर विभागीय कार्यालयात केली आहे. काही दिवसांपूर्वी खारघर शहरात आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी पाहणी दौरा केला होता, तेव्हा त्यांच्यासोबत सर्व नगरसेवक उपस्थित होते. गावठाणातील नालेसफाईला आम्ही सुरु वात केली आहे. गावातील अंतर्गत गटारांच्या कामाला सोमवारपासून सुुरुवात केली जाईल, अशी प्रतिक्रि या महापालिकेचे खारघर विभागीय अधिकारी श्रीराम हजारे यांनी दिली.