चंद्रकांत पाटलांवर राष्ट्रवादीची धुरा; शरद पवार गटाकडून नवी मुंबईची जबाबदारी

By नारायण जाधव | Published: November 7, 2023 06:41 PM2023-11-07T18:41:00+5:302023-11-07T18:41:47+5:30

मंगळवारी मुंबई झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या हस्ते चंद्रकांत पाटील यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

NCP attack on Chandrakant Patal; Responsibility of Navi Mumbai from Sharad Pawar group | चंद्रकांत पाटलांवर राष्ट्रवादीची धुरा; शरद पवार गटाकडून नवी मुंबईची जबाबदारी

चंद्रकांत पाटलांवर राष्ट्रवादीची धुरा; शरद पवार गटाकडून नवी मुंबईची जबाबदारी

नारायण जाधव

नवी मुंबई : नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्याशरद पवार गटाची धुरा अखेर तुर्भे येथील माजी नगरसेवक तथा माथाडी नेते (सी आर पाटील) चंद्रकांत पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने पाटील घराण्यात दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद आले आहे. यापूर्वी त्यांचे ज्येष्ठ बंधू स्व. डी. आर. पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर पक्षाचे पहिले नवी मुंबई जिल्हाध्यक्ष होते.

मंगळवारी मुंबई झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या हस्ते चंद्रकांत पाटील यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. नियुक्तीनंतर पक्षाचे नेते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.
नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादीचे यापूर्वीचे अध्यक्ष नामदेव भगत यांनी अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केल्यापासून पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्षपद रिक्त होते. या पदावर चंद्रकांत पाटील हेच प्रबळ दावेदार होते. कारण, स्थानिक प्रकल्पग्रस्त तसेच आगरी समाजाचे असून माथाडी युनियनमध्ये पूर्वीपासून सक्रिय आहेत. यामुळे पक्षाला पहिल्यांदाच प्रकल्पग्रस्तांसह माथाडी कामगारांत प्रिय असलेली व्यक्ती अध्यक्षपदी मिळाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकपद, प्रथितयश व्यावसायिक म्हूणन ते शहरात परिचित आहेत.

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस नेत्यांशीही त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे धर्मनिरपेक्ष विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून शहरांत राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढवून नवी मुंबईत महाविकास आघाडीला बळकटी देण्यावर आपला भर राहील, पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ करू, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: NCP attack on Chandrakant Patal; Responsibility of Navi Mumbai from Sharad Pawar group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.