खासदार निधीच्या प्रस्तावाला राष्ट्रवादीचा खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 03:38 AM2017-07-22T03:38:04+5:302017-07-22T03:38:04+5:30

शिवसेना खासदार राजन विचारे यांनी सानपाड्यामध्ये व्यायामशाळा उभारण्यासाठी निधी दिला आहे. परंतु स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेवकांनी

NCP lost its proposal for funding | खासदार निधीच्या प्रस्तावाला राष्ट्रवादीचा खो

खासदार निधीच्या प्रस्तावाला राष्ट्रवादीचा खो

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : शिवसेना खासदार राजन विचारे यांनी सानपाड्यामध्ये व्यायामशाळा उभारण्यासाठी निधी दिला आहे. परंतु स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेवकांनी याविषयी नकारात्मक भूमिका घेवून प्रस्ताव स्थगित केला आहे. यामुळे शिवसेना नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांचा निषेध करून सभात्याग केला.
नवी मुंबईमधील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी त्यांचा जास्तीत जास्त निधी याठिकाणी वापरण्यास प्राधान्य दिले आहे. याशिवाय रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करून सानपाडा दत्त मंदिरजवळ नवीन पादचारी पूल बांधून घेतला आहे. जुईनगर रेल्वे वसाहतीमधील रखडलेली कामे मार्गी लावली असून तुर्भे व बेलापूरमधील रेल्वे क्रॉसिंगवर पूल बांधण्याचा प्रश्नही नुकताच मार्गी लावला आहे. सानपाडा सेक्टर ५ मधील गावदेवी मैदानामध्ये अत्याधुनिक व्यायामशाळा उभारण्यासाठी ५० लाख रूपये निधी उपलब्ध करून दिला आहे. येथील मैदानामध्ये ८४ चौरस मीटर भूखंडावर व्यायामशाळा उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून त्याविषयी प्रस्ताव तयार केला आहे. पालिका प्रशासनाने निविदा प्रक्रिया पूर्ण करून हा प्रस्ताव स्थायी समिती सभागृहात मांडला होता. राष्ट्रवादी काँगे्रसच्या सदस्यांनी याविषयी नकारात्मक भूमिका मांडली. अशोक गुरखे यांनी या मैदानामध्ये जावून पाहणी केली पाहिजे अशी भूमिका घेतली. याशिवाय ४० प्लस संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणे आवश्यक असून इतर कारणे सांगनू हा प्रस्ताव स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राष्ट्रवादी काँगे्रसने प्रस्तावास अप्रत्यक्षपणे विरोध दर्शविल्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आतापर्यंत किती विकास कामांच्या ठिकाणी जावून पाहणी केली असा प्रश्नही उपस्थित केला. जर राष्ट्रवादी मनमानी करणार असेल तर आम्हाला सभात्याग करावा लागेल अशी भूमिका नामदेव भगत व द्वारकानाथ भोईर यांनी मांडल्यानंतरही सभापतींनी प्रस्तावाला स्थगिती दिली.

विकासकामांना विरोध करण्याची भूमिका चुकीची आहे. आम्ही या घटनेचा निषेध करून सभात्याग केला. खासदार निधीतून काम होत असल्याचे विरोधाची भूमिका घेण्यात आली आहे.
- नामदेव भगत, नगरसेवक,
शिवसेना

यापूर्वी रूग्णालयामध्ये व्हेंटिलेटर खरेदीसाठी खासदारांनी निधी देवूनही त्याचा उपयोग केला नाही. मनपाने आलेला निधी परत पाठविला. आता पुन्हा विरोध करणे चुकीचे असून आम्ही याचा निषेध करत आहोत.
- द्वारकानाथ भोईर,
गटनेते,
शिवसेना

Web Title: NCP lost its proposal for funding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.