खासदार निलबंनाच्या निषेधार्थ वाशीत राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने

By नारायण जाधव | Published: December 22, 2023 07:56 PM2023-12-22T19:56:21+5:302023-12-22T19:56:44+5:30

१४९ खासदारांना संसदेच्या चालू अधिवेशनात निलंबित केले

NCP protests in Vashi against MP suspension | खासदार निलबंनाच्या निषेधार्थ वाशीत राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने

खासदार निलबंनाच्या निषेधार्थ वाशीत राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने

नवी मुंबई : सलग ७ वेळा संसदरत्न व २ वेळा संसद महारत्न पुरस्कार मिळवणाऱ्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह, खा. डॉ. अमोल कोल्हे आणि विरोधी पक्षाच्या तब्बल १४९ खासदारांना संसदेच्या चालू अधिवेशनात निलंबित केले आहे. संसदेत झालेल्या घुसखोरीप्रकरणी सरकारे उत्तर द्यावे, अशी या खासदारांची मागणी होती. मात्र, हे उत्तर न देता विद्यमान मोदी सरकारने त्यांना निलंबित केले आहे.

याचा निषेध करण्यासाठी नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने २२ डिसेंबर रोजी शहरातील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी ६ ते ८ या वेळेत हे निषेध आंदोलन केले. पक्षाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात राजू शिंदे, अन्नू आंग्रे यांच्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यात महिलांची संख्या उल्लेखनिय अशी होती.यावेळी उपस्थितांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करून लोकशाही पायदळी तुडविल्याचा आरोप करून निषेध केला.

Web Title: NCP protests in Vashi against MP suspension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.