समित्यांवर राष्ट्रवादीचेच वर्चस्व

By admin | Published: August 6, 2015 11:43 PM2015-08-06T23:43:13+5:302015-08-06T23:43:13+5:30

महापालिकेच्या विशेष समित्यांच्या निवडणुकीमध्येही राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीने वर्चस्व मिळविले आहे. ८ पैकी ७ समित्यांवर राष्ट्रवादीचे सभापती झाले असून

NCP's domination over the committees | समित्यांवर राष्ट्रवादीचेच वर्चस्व

समित्यांवर राष्ट्रवादीचेच वर्चस्व

Next

नवी मुंबई : महापालिकेच्या विशेष समित्यांच्या निवडणुकीमध्येही राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीने वर्चस्व मिळविले आहे. ८ पैकी ७ समित्यांवर राष्ट्रवादीचे सभापती झाले असून, आरोग्य समितीचे सभापतीपद काँगे्रसला देण्यात आले आहे. महापौर व स्थायी समितीप्रमाणे विषय समित्यांच्या निवडणुकीमध्येही युतीला काहीही चमत्कार दाखविता आलेला नाही.
महापौर, उपमहापौर व स्थायी समिती निवडणुकीनंतर सर्व नगरसेवकांचे विशेष समित्यांच्या सभापती पदाकडे लक्ष लागून राहिले होते. वास्तविक निवडणुकांमुळे सभापतींची निवड करण्यास विलंब झाला. नवीन पदाधिकाऱ्यांना ७ ते ८ महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे. यामुळे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी पहिल्या वर्षी सभापती होण्यास अनुत्सुक होते. सकाळी महापालिकेच्या सभागृहात झालेल्या निवडणुकीमध्ये सर्व समित्यांवर काँगे्रस व राष्ट्रवादी आघाडीने वर्चस्व मिळविले. क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती प्रकाश मोरे व पाणीपुरवठा व मलनिस्सारण समिती पदावर अशोक गुरखे यांची बिनविरोध निवड झाली. महिला व बालकल्याण समिती सभापतीपदावर अपर्णा गवते, आरोग्य समिती सभापतीपदावर काँगे्रसच्या पूनम पाटील, समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समितीवर मोनिका पाटील, विधी समितीवर अ‍ॅड. भारती पाटील, विद्यार्थी व युवक कल्याण समिती सभापतीपदावर गिरीश म्हात्रे तर उद्यान व शहर सुशोभीकरण समितीवर स्वप्ना गावडे यांची निवड झाली आहे.
रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल उगले यांच्या उपस्थितीमध्ये निवडणुका पार पडल्या. नवनिर्वाचित सभापती व उपसभापतींचे महापौर सुधाकर सोनावणे, उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, माजी खासदार संजीव नाईक, सागर नाईक, रमाकांत म्हात्रे, पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी अभिनंदन केले.

Web Title: NCP's domination over the committees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.