राष्ट्रवादीच्या पनवेल शहर जिल्हा अध्यक्षांचा राजीनामा! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2023 04:47 PM2023-05-02T16:47:00+5:302023-05-02T16:49:26+5:30

सतिश पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राजीनामा पाठवला

NCP's Panvel city district president resigns! | राष्ट्रवादीच्या पनवेल शहर जिल्हा अध्यक्षांचा राजीनामा! 

राष्ट्रवादीच्या पनवेल शहर जिल्हा अध्यक्षांचा राजीनामा! 

googlenewsNext

- अरुणकुमार मेहत्रे 

कळंबोली : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरून बाजूला होण्याचा निर्णय घेतल्याचे पडसाद पनवेल मध्ये सुद्धा उमटले आहेत. पक्षाचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सतिश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवला आहे. पवार साहेब जर अध्यक्ष नसतील तर मी सुद्धा जिल्हाध्यक्षपदावर काम करणार नाही, अशी प्रखर  भूमिका पाटील यांनी घेतली  आहे.

गुरुवारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एकच खळबळ उडाली आहे. पक्षाच्या नेत्यांनी राजीनाम्याला विरोध केला आहे. राजीनामा मागे घ्यावा अशी विनंती सुद्धा त्यांनी केली. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर समोर ठिय्या मांडून आंदोलन केले. त्याचे पडसाद पनवेल मध्ये सुद्धा उमटले. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पनवेल जिल्हाध्यक्ष सतिश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवला आहे. आपल्या राजांना पत्रात पाटील यांनी म्हटले आहे की ही गोष्ट खरोखर धक्कादायक आहे. साहेब आपली ऊर्जा आहेत. या वयातही त्यांनी संघर्ष करून पक्षाला सर्वोच्च स्थानी नेले. ते तळागळातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते  प्रेरणास्थान आहे. शरद पवार हे महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे नेते आहेत. हे एक सगळ्या क्षेत्रातील विद्यापीठ आहेत. 

जनसामान्यांच्या हितासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्च घातले. पुरोगामी विचारांचा पुरस्कार करून राजकारणामध्ये महिलांना सन्मान  मिळवून दिला. अनेक लोकहिताचे निर्णय घेतले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे संरक्षण आणि कृषी मंत्री म्हणून त्यांनी हिमालयासारखे काम केले. पवार यांनी  अचानकपणे राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून  बाजूला होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे माझ्यासह अनेकांना खूप वेदना झाल्या. शरद पवार हे अध्यक्षपदावर राहत नसतील तर मी सुद्धा पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा आपल्याकडे सपूद  करीत आहे. हा राजीनामा आपण स्वीकारावा अशी विनंती सतिश पाटील यांनी केली आहे.

Web Title: NCP's Panvel city district president resigns!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.