नवी मुंबईत पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्याची गरज; महापौरांचे मनोगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 11:22 PM2020-01-01T23:22:34+5:302020-01-01T23:22:41+5:30

महापालिकेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

The need for alternative water management in Navi Mumbai; Mayor's affidavit | नवी मुंबईत पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्याची गरज; महापौरांचे मनोगत

नवी मुंबईत पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्याची गरज; महापौरांचे मनोगत

Next

नवी मुंबई : नवी मुंबई शहराची लोकसंख्या वाढत असून, नागरीकीकरणही झपाट्याने वाढत आहे. भविष्यात २४ तास पाणीपुरवठा करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असून, त्यावर तोडगा काढण्यासाठी पावसाळा कालावधीमध्ये मोरबे धरणातील पाणी बंद करून अतिरिक्त पाण्यासाठी टाटा पॉवरचे वाहणारे पाणी भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात सोडून शहराच्या वापरासाठी आणावे. त्यामुळे मोरबेमधील पाणीसाठा जास्त काळ टिकेल आणि भविष्यात येणाऱ्या संकटापासून बचाव होणार असल्याचे मनोगत महापौर जयवंत सुतार यांनी व्यक्त केले. यासाठी अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. बुधवार, १ जानेवारी रोजी महापालिकेचा २८ वा वर्धापन दिन साजरा झाला, त्या वेळी ते बोलत होते.

महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त मागील वाटचालीचा आढावा घेतानाच, आगामी काळात करावयाच्या कामांचे नियोजन करण्याचा हा दिवस असल्याचे सांगितले. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई हे शहर आंतरराष्ट्रीय स्तरावरील शहराच्या दिशेने झेपावत असून, आगामी काळात नवी मुंबईत पर्यटनाच्या दृष्टीने दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात, तसेच आपत्कालीन व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सेवा, महिलानिर्मित साहित्यासाठी विक्र ी केंद्र, ज्वेल आॅफ नवी मुंबईचे अद्ययावतीकरण, ज्येष्ठ नागरिक भवन अशा विविध बाबींच्या उपलब्धतेची गरज व्यक्त केली. या वेळी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना पाच स्टार रेटिंग मिळवणारी राज्यातील पहिली महानगरपालिका असल्याचा अभिमान व्यक्त करीत या पुढील काळात सात स्टार रेटिंगसाठी सर्वांच्या सहयोगाने आपला प्रयत्न असेल, असा संकल्प व्यक्त केला.

या कार्यक्र माच्या निमित्ताने नगरसेवक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संपन्न झालेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभही पार पडला. डिसेंबर महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाºयांचा सन्मानदेखील करण्यात आला. या कार्यक्र माला उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, स्थायी समितीचे सभापती नवीन गवते, क्र ीडा व सांस्कृतिक कार्यक्र म समिती सभापती डॉ. जयाजी नाथ, आरोग्य समिती सभापती शशिकला पाटील, नगरसेविका अंजली वाळुंज, श्रद्धा गवस, नगरसेवक रामचंद्र घरत, देविदास हांडे-पाटील, प्रकाश मोरे आदी नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२०’ करिता गीतकार धनश्री देसाई यांनी लिहिलेल्या व रोहित शास्त्री यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘नवी मुंबई चमकवू या’ या स्वच्छता जिंगलचे प्रसिद्घी प्रक्षेपण करण्यात आले. महानगरपालिकेच्या सन २०२० च्या दैनंदिनी व दिनदर्शिकेचे प्रकाशन महापौरांच्या हस्ते करण्यात आले. 

भावे नाट्यगृह सुरू
महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्ताने नाट्यगृहाचा नूतनीकरणोतर शुभारंभ संपन्न झाला असून नाट्यगृह सुरू झाले आहे. त्यामुळे नाट्यगृहप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Web Title: The need for alternative water management in Navi Mumbai; Mayor's affidavit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.