शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

नवी मुंबईत पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्याची गरज; महापौरांचे मनोगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 11:22 PM

महापालिकेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

नवी मुंबई : नवी मुंबई शहराची लोकसंख्या वाढत असून, नागरीकीकरणही झपाट्याने वाढत आहे. भविष्यात २४ तास पाणीपुरवठा करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असून, त्यावर तोडगा काढण्यासाठी पावसाळा कालावधीमध्ये मोरबे धरणातील पाणी बंद करून अतिरिक्त पाण्यासाठी टाटा पॉवरचे वाहणारे पाणी भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात सोडून शहराच्या वापरासाठी आणावे. त्यामुळे मोरबेमधील पाणीसाठा जास्त काळ टिकेल आणि भविष्यात येणाऱ्या संकटापासून बचाव होणार असल्याचे मनोगत महापौर जयवंत सुतार यांनी व्यक्त केले. यासाठी अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. बुधवार, १ जानेवारी रोजी महापालिकेचा २८ वा वर्धापन दिन साजरा झाला, त्या वेळी ते बोलत होते.महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त मागील वाटचालीचा आढावा घेतानाच, आगामी काळात करावयाच्या कामांचे नियोजन करण्याचा हा दिवस असल्याचे सांगितले. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई हे शहर आंतरराष्ट्रीय स्तरावरील शहराच्या दिशेने झेपावत असून, आगामी काळात नवी मुंबईत पर्यटनाच्या दृष्टीने दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात, तसेच आपत्कालीन व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सेवा, महिलानिर्मित साहित्यासाठी विक्र ी केंद्र, ज्वेल आॅफ नवी मुंबईचे अद्ययावतीकरण, ज्येष्ठ नागरिक भवन अशा विविध बाबींच्या उपलब्धतेची गरज व्यक्त केली. या वेळी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना पाच स्टार रेटिंग मिळवणारी राज्यातील पहिली महानगरपालिका असल्याचा अभिमान व्यक्त करीत या पुढील काळात सात स्टार रेटिंगसाठी सर्वांच्या सहयोगाने आपला प्रयत्न असेल, असा संकल्प व्यक्त केला.या कार्यक्र माच्या निमित्ताने नगरसेवक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संपन्न झालेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभही पार पडला. डिसेंबर महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाºयांचा सन्मानदेखील करण्यात आला. या कार्यक्र माला उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, स्थायी समितीचे सभापती नवीन गवते, क्र ीडा व सांस्कृतिक कार्यक्र म समिती सभापती डॉ. जयाजी नाथ, आरोग्य समिती सभापती शशिकला पाटील, नगरसेविका अंजली वाळुंज, श्रद्धा गवस, नगरसेवक रामचंद्र घरत, देविदास हांडे-पाटील, प्रकाश मोरे आदी नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२०’ करिता गीतकार धनश्री देसाई यांनी लिहिलेल्या व रोहित शास्त्री यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘नवी मुंबई चमकवू या’ या स्वच्छता जिंगलचे प्रसिद्घी प्रक्षेपण करण्यात आले. महानगरपालिकेच्या सन २०२० च्या दैनंदिनी व दिनदर्शिकेचे प्रकाशन महापौरांच्या हस्ते करण्यात आले. भावे नाट्यगृह सुरूमहापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्ताने नाट्यगृहाचा नूतनीकरणोतर शुभारंभ संपन्न झाला असून नाट्यगृह सुरू झाले आहे. त्यामुळे नाट्यगृहप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका