एपीएमसीला आंतरराष्ट्रीय मार्केट बनविण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 11:23 PM2019-08-29T23:23:49+5:302019-08-29T23:34:42+5:30
चंद्रकांत पाटील यांचे मत : कृषिपूरक व्यवसायाच्या गाळ्यांचा शुभारंभ संपन्न
नवी मुंबई : देशात हरित क्रांतीमुळे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत आहे. ही उत्पादने परदेशात गेली तर शेतकऱ्यांच्या शेतमालालाही चांगला दर मिळेल. यासाठी परदेशात मागणी असलेल्या पावडर, ताजी, पिकणारी अशा विविध फॉरमॅटमध्ये उत्पादने तयार होणे गरजेचे आहे. यासाठी एपीएमसी मार्केटमधे सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असून एपीएमसीला आंतरराष्ट्रीय मार्केट बनविण्याची गरज असल्याचे मत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. गुरु वार, २९ आॅगस्ट रोजी तुर्भे येथील बाजार समितीच्या छत्रपती संभाजी भाजीपाला आवार संकुलमधील कृषिपूरक व्यवसायाच्या गाळ्यांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
बाजार समितींमधील अनेक निर्णय गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या आणि व्यापाºयांच्या सोईचे नव्हते. यामध्ये प्रामुख्याने शेतकºयाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातच शेतमाल विकला पाहिजे असा नियम होता. त्यामुळे शेतकºयांना सक्तीने बाजार समितीच्या आवारात शेतमाल विकावा लागत असल्याचे पाटील म्हणाले. आम्ही ही सक्ती काढली आहे, पणन मंत्री असताना शेतकºयाला सुरक्षित वाटेल त्या ठिकाणी माल विकू शकतो असा निर्णय घेतला. या निर्णयानुसार अनेक शेतकºयांचे गट एकत्र होऊन कंपनी स्थापन झाली आहे. या माध्यमातून शेतकरी ज्या ठिकाणी जास्त नफा वाटेल त्याठिकाणी शेतमाल विकत असल्याचे सांगत या निर्णयानंतर देखील मार्केटमधील आवक कमी झाली नसल्याचे पाटील म्हणाले.
बाजार समितीच्या आवारात शेतीपूरक वस्तू विकायच्या नाहीत असा देखील नियम होता; परंतु गेल्या पाच वर्षांत सरकारने लोकापयोगी निर्णय घेताना तत्काळ निर्णय घ्यायला सुरु वात केली असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील बाजार समितीमध्ये खूप बदल करण्याची आवश्यकता असून मार्केट वाढले पाहिजेत, सुविधा वाढल्या पाहिजेत, प्रामाणिक व्यवहार, शेतकºयांच्या शेतमालाला योग्य दर, शेतकºयांना वेळेत पैसे मिळाले पाहिजे असल्याचे पाटील म्हणाले. यासाठी राज्यातील शासकीय आणि खासगी बाजार समित्यांमध्ये बदल करण्याची आवश्यकता असल्याचे पाटील यांनी सांगितले. आमदार मंदा म्हात्रे यांनी सदर मार्केटमध्ये कृषिपूरक व्यवसाय सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला होता.
पाठपुराव्याला यश आल्याने आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. भाजी मार्केटची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून मार्केटची सर्व सोयी-सुविधांयुक्त बांधणी करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्केट उभारण्यात यावे त्यामुळे शेतकºयांच्या शेतमालाला देखील चांगला दर मिळणार असून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार असल्याचे म्हात्रे म्हणाल्या. या वेळी बाजार समितीचे प्रशासक सतीश सोनी, माथाडी नेते नरेंद्र पाटील, महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, नगरसेविका शुभांगी पाटील आदी मान्यवर, कृषी उत्पन्न व्यापारी वेलफेयर असोसिएशनचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
मला युतीविषयी बोलण्याचा अधिकार
च्लोकसभा निवडणुकीआधी भाजपचे अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीचा फॉर्म्युला ठरवला आहे. त्या वेळी झालेल्या बैठकीला मी नव्हतो. आता प्रदेशाध्यक्ष म्हणून याबाबत बोलण्याचा अधिकार मला असून युती बाबत निर्णय ते ते तिघे घेतील, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
पूरग्रस्तांना सामाजिक मदत करण्याचे आवाहन
च्पूरग्रस्तांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने आपदा नावाने खाते उघडले असून, भाजपच्या लोकप्रतिनिधींना एक महिन्याचे वेतन जमा करण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचे पाटील यांनी सांगितले. जमा होणाºया पैशातून पूरग्रस्त भागातील १०० गावांमधील शाळांची दुरु स्ती केली जाणार आहे. कोल्हापूर अंबाबाई देवस्थानच्या माध्यमातून १०० गावांमधील मंदिरांची दुरु स्ती आणि सुविधांची कामे केली जाणार असून, अशा प्रकारे १०० गावांसाठी व्यापाºयांनीही सामाजिक मदत करण्याचे आवाहन पाटील यांनी केले.