आपत्ती टाळण्याच्या दृष्टीने सतर्क असणे आवश्यक

By admin | Published: May 10, 2017 12:17 AM2017-05-10T00:17:46+5:302017-05-10T00:17:46+5:30

आपत्ती टाळण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे, तसेच मान्सूनपूर्व कोकण विभागातील शासकीय यंत्रणेच्या तयारीचा आढावा

Need to be cautious in avoiding disaster | आपत्ती टाळण्याच्या दृष्टीने सतर्क असणे आवश्यक

आपत्ती टाळण्याच्या दृष्टीने सतर्क असणे आवश्यक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई: आपत्ती टाळण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे, तसेच मान्सूनपूर्व कोकण विभागातील शासकीय यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेण्याकरिता मंगळवारी बेलापूर येथील कोकण विभागीय कार्यालयात जिल्हानिहाय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीदरम्यान मार्गदर्शन करताना आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी आराखडा तयार करावा. तसेच सर्व जिल्ह्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागात आवश्यक ती माहिती अद्ययावत करावी, असे निर्देश उपायुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी दिले.
कोकण विभागातील सर्व नियंत्रण कक्ष २४ तास सुरु ठेवून जेथे जेथे आवश्यक असेल तेथे कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी. तसेच आपत्ती काळात तात्काळ मदत करु न आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने सर्वांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन उपायुक्त यांनी केले आहे. अवेळी पावसाने विजा पडण्याचे प्रमाण वाढले आहे वीज कोसळल्याने मनुष्यहानीसह वित्तहानीही मोठ्या प्रमाणात होत आहे.यादृष्टीने विभागात बसविण्यात आलेल्या वीजरोधक सुस्थितीत आहे किंवा नाही हे त्वरित पाहण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
पावसाळ्यात बऱ्याचदा कोकण रेल्वेच्या मार्गात दरडी कोसळण्याचे प्रकार घडतात. त्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या बैठकीस प्रभारी जिल्हाधिकारी मुंबई शहर बन्सी गवळी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग विजय जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी ठाणे, वंदना सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका अंकुश चव्हाण, मीरा -भार्इंदर महानगरपालिका उपायुक्त दीपक पुजारी, वसई - विरार महानगरपालिका उपायुक्त अजीज शेख, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका उपायुक्त धनाजी तोरस्कर आदी उपस्थित होते. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,
पालघर, तसेच मुंबई शहर, मुंबई उपनगर जिल्ह्यातील तसेच सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे आदी विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
कोकण विभागात बऱ्याच ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण होत असते. पूर रेषा निश्चित करणे, रस्त्यांची व पुलांची दुरु स्ती, औषध उपलब्धता, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, तात्पुरते निवारे, आरोग्य व स्वच्छता ठेवणे या अनुषंगाने केलेल्या कामाचा देखील बैठकीत आढावा घेण्यात आला.

Web Title: Need to be cautious in avoiding disaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.