शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
5
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
6
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
7
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
8
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
9
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
12
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
13
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
14
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
15
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
16
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
17
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
18
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
19
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
20
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात

आदिवासी भागाला प्रवाहात आणण्याची गरज

By admin | Published: May 06, 2017 6:22 AM

भविष्यात सुरू होणारे मेट्रो रेल्वेचे शेवटचे स्थानक, तळोजा कारागृह, सीआरपीएफ बटालियन केंद्र, सिडकोचा स्वप्नपूर्ती प्रकल्प

वैभव गायकर/ लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : भविष्यात सुरू होणारे मेट्रो रेल्वेचे शेवटचे स्थानक, तळोजा कारागृह, सीआरपीएफ बटालियन केंद्र, सिडकोचा स्वप्नपूर्ती प्रकल्प अशा बहुउद्देशीय प्रकल्पांचा समावेश असलेला खारघर व तळोजा शहराला जोडणारा असा प्रभाग क्र मांक तीन आहे. धामोळे आदिवासी पाडा, ओवा कॅम्प, तळोजा पाचनंद यामुळे गावांचा या प्रभागात समावेश आहे. मात्र सिडकोने या ठिकाणचा विकास करताना गावठाण, आदिवासी पाडे आणि शहरी भाग असा भेदभाव केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. हा भेदभाव पुसून सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न पनवेल महापालिकेला करावा लागणार आहे. खारघर नोडचा विस्तार सेक्टर ३५ पर्यंत झाल्यामुळे अत्याधुनिक शहर म्हणून हा भाग ओळखला जावू लागला आहे. तसेच तळोजा पाचनंद गावाच्या विरुध्द दिशेला पनवेल-दिवा महामार्गाशेजारी तळोजा पाचनंद म्हणजेच तळोजा फेज २ चा विकास झाला आहे. तसेच फेज ३ मध्ये विकसित झालेल्या वसाहतींमध्ये सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. वसाहतीच्या दोन ते तीन किमी परिसरात पोलीस चौकी नसल्यामुळे थेट तळोजा एमआयडीसीत जावून पोलीस ठाणे गाठावे लागते. याशिवाय सिडकोच्या या वसाहतींमधील पाणीप्रश्न देखील गंभीर आहे. सिडकोने कबूल केल्याप्रमाणे मुबलक पाणि आजतागायत दिलेले नाही. कमी दाबाने पाणी येत असल्याने पुरेसे पाणी उपलब्ध नसते. महापालिका पाण्याची ही गंभीर समस्या सोडवेल अशी आशा इथले नागरिक व्यक्त करीत आहेत. तसेच तळोजा पाचनंद येथील नागरिक नवी मुंबई, मुंबईकडे जाण्यासाठी खारघर रेल्वेस्थानकाकडे जातात. पनवेल-दिवा लोहमार्ग ओलांडण्यासाठी उड्डाणपूल नसल्यामुळे इथल्या प्रवाशांची गैरसोय होते आहे. तसेच सार्वजनिक बसवाहतुकीच्या फेऱ्या वाढवून खारघर रेल्वे स्थानकाच्या रेल्वेच्या वेळेनुसार सुरू करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. ओवेकॅम्प, धामोळे आदिवासी पाड्यात भीषण पाणीटंचाई आहे. तळोजा हा भाग मुख्यत्वेकरून मुस्लीमबहुल भाग म्हणून ओळखला जातो. या परिसरात असलेल्या भोईरपाडा, पेठार्ली या गावांत देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. या मूलभूत प्रश्नांसह गावांतील तत्कालीन जिल्हापरिषदेच्या शाळांच्या इमारतींची अवस्था वाईट झाली आहे. महापालिकेने विद्यार्थ्यांना उत्साही वातावरणात शिक्षण घेता यावे यासाठी शाळांच्या इमारतींचा विकास करणे आवश्यक आहे.