शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

रेवस-रेड्डी सागरी महामार्गाच्या भूसंपादनासाठी हवा सल्लागार, कोकणवासीयांच्या आशा उंचावल्या

By नारायण जाधव | Published: September 20, 2022 4:32 PM

रस्ते विकास महामंडळाकडून शोध सुरू.

नवी मुंबई : कोकणच्या विकासात मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या रेवस ते रेड्डी या ४९८ किमीच्या सागरी महामार्गाच्या भूसंपादनासाठी आता राज्य रस्ते विकास महामंडळाने सल्लागाराचा शोध सुरू केला आहे. सध्या इच्छुकांकडून महामंडळाने स्वारस्य अभिकर्तासाठीचे प्रस्ताव मागविले असून इच्छुकांची पूर्व प्रस्ताव बैठक येत्या २७ सप्टेंबर २०२२ रोजी महामंडळाच्या कार्यालयात होणार आहे. तर तांत्रिक निविदा सादर करण्याची मुदत १७ ऑक्टोबर २०२२ पर्यंत आहे. महामंडळाने रेवस-रेड्डी सागरी महामार्गाची आणखी एक पाऊल उचलल्याने कोकणवासीयांच्या आशा उंचावल्या आहेत. हा सल्लागार भूसंपादनापासून ते अवॉर्ड स्टेजपर्यंत सर्व ती मदत आणि परवानग्या मिळवून देण्याचे काम करणार आहे. ४९८ किमीच्या या मार्गासाठी ९,५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

३३ प्रमुख शहरे जाेडणारआधीच्या रस्त्यांचे रुंदीकरण आणि सुधारणा करून हा मार्ग उभारला जात आहे. यापूर्वीच्या नियोजनानुसार दुपदरी मार्ग उभारला जाणार होता. मात्र, आता त्यात बदल केला असून सुधारित आराखड्यानुसार सुमारे १६५ किमीचा रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. तर उर्वरित रस्ता दुपदरी असेल. तसेच ३३ प्रमुख शहरे/गावे आणि शहरांच्या ठिकाणी बाह्य वळणे घेतली जाणार आहेत.

केळशीसह धरमतर खाडीवर होणार पूलया सागरी मार्गाला सलगता येण्यासाठी खाडीवर नव्याने पूल उभारले जाणार आहेत. यातून वाहनांचा वेढा वाचणार असून प्रवासाचे अंतर घटणार आहे. यातील केळशी खाडीवर पुलाची उभारणीसाठी १४८ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी मिळाली आहे. तर धरमतर खाडीवर रेवस ते उरण नजीकच्या करंजा बंदराला जोडणाऱ्या दोन किमीच्या सागरीपुलावर रस्ते विकास महामंडळ ८९७ काेटी ७० लाख रुपये खर्च करणार आहे. सध्या रेवस- कारंजा प्रवासासाठी वाहनधारकांना ७० किमीचा प्रवास रस्त्याने करावा लागतो. यात दोन तासांचा अवधी लागतो. तर जलवाहतुकीसाठी दोन ठिकाणांदरम्यान १५ मिनिटे लागतात. मात्र, पावसाळ्यात फेरी सेवा बंद असल्याने प्रवास करणे अत्यंत कठीण होते. त्यामुळे हा पूल महत्त्वाचा आहे. तसेच यापुलामुळे जेएनपीटी बंदरासह नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अलिबागसह कोकणाशी जोडले जाणार आहे.

चार टप्प्यांत होणार कामया सागरी महामार्गाच्या पहिल्या भागामध्ये उरण तालुक्यातील चिर्ले गाव ते बाणकोटपर्यंत १५० किलोमीटर, दुसऱ्या भागामध्ये रायगड जिल्ह्यातील बाणकोट ते रत्नागिरी जिल्ह्यातील जयगडपर्यंत १४० किलोमीटर, तिसऱ्या भागामध्ये जयगड ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खाक्षितीठापर्यंत १२८ किलोमीटर व चौथ्या भागात खाक्षितीठा ते रेवस बंदरापर्यंत १२२ किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाचा समावेश आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई