समाज परीवर्तन ही काळाची गरज
By admin | Published: January 24, 2017 06:05 AM2017-01-24T06:05:34+5:302017-01-24T06:05:34+5:30
नेरुळमधील डी.वाय. पाटील येथे सोमवारी ११ व्या वार्षिक पदवी दान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. पीएचडी, सुवर्णपदक,फेलोशिप
नवी मुंबई : नेरुळमधील डी.वाय. पाटील येथे सोमवारी ११ व्या वार्षिक पदवी दान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. पीएचडी, सुवर्णपदक,फेलोशिप आणि हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित केंद्रीय आरोग्य मंत्री फागनसिंग कुलस्ते यांनी समाज परिवर्तन ही खरी काळाजी गरज असल्याचे प्रतिपादन केले. या सोहळ््यात विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केलेल्या सुप्रसिध्द गायक सुरेश वाडकर, बालाजी तांबे, ज्ञानेश्वर मुळे, मनोहर कारकुंडे आणि के. वासु यांना डी. लिट मानाची पदवी प्रदान करण्यात आली.
या दिक्षांत सोहळ््यात उपस्थितांशी संवाद साधताना नागरिकांना चांगली आरोग्य सेवा घडावी आणि औषधे मोफत उपलब्ध करून दिली पाहिजेत अशी मागणी कुलस्ते यांनी केली. रुग्णांना मोफत औषध उपलब्ध करून देण्याकरिता कुलस्ते पाठपुरावा सुरु असल्याचे स्पष्ट केले. संगीत क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारे सुप्रसिध्द गायक सुरेश वाडकर यांनी कोणत्याही क्षेत्रात उंची गाठताना समाजाचा विसर पडू नये असे मोलाचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. सोहळ््यात उपस्थितांकरिता वाडकर यांनी गीत सादर केले. डी. वाय पाटील स्टेडीअम येथे झालेल्या कार्यक्रमात डी.वाय पाटील विद्यापीठाच्या विविध शाखेतील विद्यार्थ्यांना पदवी दान करण्यात आले. यावेळी बिहार व त्रिपुराचे माजी राज्यपाल आणि संस्थापक कुलपती डॉ. डी. वाय पाटील, कुलपती डॉ. विजय पाटील, कुलगुरु डॉ. शिरीष पाटील पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)