‘हिंदू कोड बिल लागू करणे गरजचे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:55 PM2019-09-17T23:55:49+5:302019-09-17T23:55:52+5:30
पंडित नेहरूंकडून हिंदू कोड बिल मंजूर झाले नाही म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजीनामा दिला.
पनवेल : पंडित नेहरूंकडून हिंदू कोड बिल मंजूर झाले नाही म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजीनामा दिला. हिंदू कोड बिल हिंदूंतील एकतेसाठी आणि न्यायासाठी आहे. यामुळे देशातील ८० टक्के हिंदूंमध्ये न्याय, एकता, अखंडता, बंधुत्व निर्माण होणार असल्याने हिंदू कोड बिल लागू करणे ही गरज असल्याचे मत प्रा. अतुल जैन यांनी खारघर येथे व्यक्त केले.
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून मंगळवारी सत्याग्रह महाविद्यालयात, ‘देशाच्या अखंडता व एकतेसाठी काय?’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता, त्या वेळी ते बोलत होते. हैदराबादच्या निजामाविरोधात वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी पोलीस कारवाई करीत या दोन्ही संस्थानांना भारतात विलीन होण्यास भाग पाडले. याच धर्तीवर कलम ३७० व तीन तलाक रद्द करून देशाचे पंतप्रधान मोदी यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असल्याचे कार्यक्र माचे अध्यक्ष डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी भाषणातून अखंड मराठवाड्यातील भूमिपुत्रांना दुजाभावाची वागणूक दिली जाते, हे अन्यायकारक असल्याचे सांगितले.
या वेळी प्रा. ललिता कोंडलवाडे, प्रा. संगिता जोगदंड, प्रा. स्वाती राऊत, प्रा. मंगेश कांबळे यांनी हैदराबाद संस्थानातील तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या मराठवाड्यातून मुंबईत रोजगार, स्वंयरोजगार, उद्योग, व्यवसाय, शिक्षण, सामाजिक अन्याय, शेतकरी आणि शेतमजूर आत्महत्याग्रस्त व जातीय अत्याचाराचे बळी असलेल्या कुटुंबातून स्थलांतरित झालेल्या नागरिकांच्या दैनंदिन व समाज जीवनातील समस्यांची मांडणी या चर्चासत्रात बोलताना केली.