पनवेल : आंब्याची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी कीटकनाशक फवारणीचे व्यवस्थापन गरजेचे आहे. याकरिता बागायतदार शेतकऱ्यांना या फवारणीचे नियोजन केल्यास जास्तीतजास्त उत्पादन क्षमता वाढून त्याचा लाभ शेतकऱ्यांना होणार असल्याचे मत कृषी विज्ञान शास्त्रज्ञ जीवन आरेकर यांनी व्यक्त केले. पळस्पे येथे आंबा मोहोर संरक्षण अभियानात ते बोलत होते.
कोकणातील काही पट्ट्यात आंबा पिकाची उत्पादन क्षमता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. आंब्याची उत्पादन क्षमता वाढवून शेतकºयांना त्याचा जास्तीतजास्त लाभ मिळावा या उद्देशाने पनवेल तालुका कृषी विभागाच्या माध्यमातून आंबा मोहोर संरक्षण अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड केली जात असून, या अभियानांतर्गत माहिती दिली जात आहे. कृषी पर्यवेक्षक टी. एन. दोलतोडे यांच्या पुढाकाराने पनवेल तालुक्यात शासनाचा उपक्र म राबविला जात आहे. आंब्याला मोहोर आल्यावर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कीटक, आळ्या आदींचा प्रादुर्भाव होत असतो. अशा वेळी या कीटकांचे योग्य वेळी व्यवस्थापन न केल्यास संपूर्ण मोहोर नष्ट होतो. त्यामुळे शेतकºयाचे मोठे नुकसान होते. अशा या कीटकांवर योग्य वेळी योग्य प्रमाणात कीटकनाशक औषधांची फवारणी केल्यास कीटक नष्ट होऊन आंब्याचा अधिक उत्पन्न घेता येऊ शकेल, या संदर्भात महत्त्वाचे मार्गदर्शन आरेकर यांनी व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते. आंब्याची लागवड केल्यानंतर मोहोर आल्यावर काय काळजी घ्यावी, या संदर्भात पूरक माहिती या उपक्रमात देण्यात आली. पनवेल तालुक्यात १२ ठिकाणी अशा प्रकारच्या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापैकी नानोशी, नेरे, चिंचवन, पळस्पे या चार गावांमध्ये या मार्गदर्शन शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे.परतीच्या पावसामुळे बळीराजा संकटात आहे. मार्च महिन्यात साधारणत: आंब्याला मोहोर येण्यास सुरुवात होते. तत्पूर्वी तीन महिने आगोदरच शेतकºयांना यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी अभियान राबविला जात आहे. यावेळी कृषी पर्यवेक्षक टी. एन. दोलतोडे, कृषी सहायक डी. एस. लाड, पी. बोरहाडे, डी. एस. लवंडे, ए. डी. बुरकूल, व्ही. एच. पाटील, माजी सरपंच आर. गवंडी, कोंडीराम चोरघे, मारुती भगत चंद्रकांत भगत आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.